News18 Lokmat

साखरपुड्याच्या जेवणात पडली पाल, ४५ जणांना विषबाधा

सर्व 45 जणांना जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2018 11:41 PM IST

साखरपुड्याच्या जेवणात पडली पाल, ४५ जणांना विषबाधामुजीब शेख, प्रतिनिधी


नांदेड, 26 नोव्हेंबर : साखरपुड्याच्या जेवणातून 45 जणांना विषबाधा झाली. नांदेड जिल्ह्यातील किनवट या तालुक्यातील सावरगाव तांडा येथे ही घटना घडली.बटाट्याच्या भाजीत पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे सांगण्यात आले.

Loading...


सावरगाव तांडा येथील जावरसिंघ पडवळे यांच्या मुलाचा साखरपुडा होता. साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पहिल्या पंगतीत जेवायला बसलेल्या सर्वाना काही वेळातच उलटयांचा त्रास होऊ लागला.


सर्व 45 जणांना जलधारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 8 जणांना किनवटच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


दरम्यान, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.


====================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 11:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...