News18 Lokmat

'नाणार' प्रकल्प महाराष्ट्रातच होणार - मुख्यमंत्री

नाणार हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो महाराष्ट्रातच झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. हा प्रकल्प झाला तर यातून 1 लाख लोकांना रोजगार मिळेल असंही त्यांनी म्हटलंय.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2018 10:35 PM IST

'नाणार' प्रकल्प महाराष्ट्रातच होणार - मुख्यमंत्री

मुंबई,ता.13 एप्रिल : नाणार हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून तो महाराष्ट्रातच झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.  हा प्रकल्प झाला तर यातून 1 लाख लोकांना रोजगार मिळेल असंही त्यांनी म्हटलंय.

कोकणातल्या लोकांमध्ये नाणार प्रकल्पाबाबत गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. लोकांना त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही या प्रकल्पाला सुरुवात करणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. याच प्रकल्पावरून कालच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर कडक टीका केली होती. मुख्यमंत्री फितूर झाले असंही त्यांनी म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्री या प्रकल्पावर ठाम असल्याचंच आजच्या त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते.

नुकतेच भाजपकडून खासदार झालेले नारायण राणे यांनीही या प्रकल्पला विरोध केला होता. गरज पडली तर राजीनामा देण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. त्यामुळं मुख्यमंत्री यातून कसा मार्ग काढतात हे महत्वाचं ठरणार आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2018 10:35 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...