S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मुख्यमंत्री मुंबईत राहुन उंटावरून शेळ्या हाकताहेत,नाना पटोलेंचं टीकास्त्र

यवतमाळच्या शेतकऱ्यांची भेट न घेणारे मुख्यमंत्री फडणवीस उंटावरून शेळ्या हाकताहेत असं म्हणत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा अहेर दिलाय.

Sachin Salve | Updated On: Oct 9, 2017 09:19 PM IST

मुख्यमंत्री मुंबईत राहुन उंटावरून शेळ्या हाकताहेत,नाना पटोलेंचं टीकास्त्र

09 आॅक्टोबर : कीटकनाशकांमुळे झालेले मृत्यू हे नरसंहारच आहे. यवतमाळच्या शेतकऱ्यांची भेट न घेणारे मुख्यमंत्री फडणवीस उंटावरून शेळ्या हाकताहेत असं म्हणत भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा अहेर दिलाय.

राज्यभरात कीटकनाशकाच्या विषबाधेमुळे ४० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा आकडा राज्य सरकारने जाहीर केल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यवतमाळात जाऊन या परिस्थितीचा आढावा घेतला नसल्याबद्दल भाजपचे खासदार नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री ड्राय पोर्टच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने वर्ध्यात गेले होते पण शेजारच्या यवतमाळच्या शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही असंही नाना पटोले म्हणाले. मुख्यमंत्री मुंबईत राहून उंटाहुन शेळ्या हाकत असल्याची टीकाही नाना पटोलेंनी केली.दरम्यान, यवतमाळात झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूची तुलना नरसंहारासोबत किशोर तिवारी यांनी केली आहे ती  योग्य असल्याचंही नाना पटोले म्हणाले. सरकारने यासंदर्भात भूमिका घ्यावी अन्यथा सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागेल असंही नाना पटोले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 9, 2017 09:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close