अजून कर्जमाफी का मिळाली नाही?, नाना पटोलेंचा सरकारला घरचा अहेर

अजून कर्जमाफी का मिळाली नाही?, नाना पटोलेंचा सरकारला घरचा अहेर

महिना झाला तरी शेतकरी कर्जमाफी का मिळाली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबलेल्या नाहीत असा सवालही त्यांनी विचारलाय.

  • Share this:

भंडारा, 13 आॅगस्ट : राज्यात पाऊस गायब झालेला आहे. त्यामुळे शेतातली उभी पिकं धोक्यात आलीये. पावसाचं लक्षण नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. तर दुसरीकडे भाजप खासदार नाना पटोलेंनी सरकारला सुनावलंय. महिना झाला तरी शेतकरी कर्जमाफी का मिळाली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबलेल्या नाहीत असा सवालही त्यांनी विचारलाय. भंडारा इथे ते बोलत होते.

'कर्जमाफीची घोषणा करून १ महिन्याचा कालावधी लोटला मात्र अजूनही काहीही झालेले नाही. शेतकऱ्यांना  ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी सक्ती केली आहे ती चुकीची व्यवस्था आहे.  आमचा शेतकरी या व्यवस्थेपर्यंत अजून  पोहोचलाच नाही. त्यामुळे बँकेकडून माहिती मागवून शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी कारण शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे आणि हे आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.  त्यामुळे राज सरकारने संवेदनशील व्हावे,  शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करावी,'  असं सांगत घरचा अहेर दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 13, 2017 07:48 PM IST

ताज्या बातम्या