नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यात

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी पुण्यातून सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर, त्याच्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे एटीएसनं आणखी दोन जणांना ताब्यात घेतलंय.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2018 01:45 PM IST

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यात

मुंबई, 11 ऑगस्ट : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी पुण्यातून सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर, त्याच्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे एटीएसनं आणखी दोन जणांना कोंढवा आणि पर्वती इथून ताब्यात घेतलंय. त्यातील एका संशयीताचं नाव जाधव असल्याचं समजतंय. या प्रकरणी राज्यभरातून आणखी काहीजणांना एटीएस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

नालासोपारामधल्या स्फोटकं जप्त प्रकरणी एटीएसनं अटक केलेल्या वैभव राऊतला या हिंदुत्ववादी सनातनी कार्यकर्त्याला त्याच्या दोन साथीदारांसह 10 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं. नालासोपाऱ्यातल्या भांडार अळीत राहणाऱ्या वैभव राऊतच्या घरी छापा मारून 20 बॉम्ब आणि 2 जिलेटीन कांड्या अशी स्फोटकं मुंबई एटीएसनं जप्त केली. तपासयंत्रणेच्या हाती लागलेली माहिती कोर्टाला सादर करताना सरकारी वकिलांनी तपासयंत्रणेच्या हाती लागलेली माहिती कोर्टाला सादर केली. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपाऱ्यात मोठा घातपात घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलीय. मुंबई एटीएसनं घातपाताचा मोठा कट उधळलाय. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी सरकारनं लावलेले आरोप फेटाळले आहेत.

वैभव राऊतच्या चौकशीदरम्यान शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांची नावं समोर आली हेती. मुंबई एटीएसनं त्या दोघांनाही अटक करून, 18 ऑगस्टपर्यंत त्यांची पोलीस कोठडी रवानगी केली. पुण्यातून सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर आज या प्रकरणात त्याच्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे एटीएसनं आणखी दोन जणांना कोंढवा आणि पर्वती इथून ताब्यात घेतलंय. त्यातील एका संशयीताचं नाव जाधव असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणात आणखी काहीजणांना राज्यभरातून एटीएस ताब्यात घेणार असल्याची माहिती न्यूज18 लोकमतला प्राप्त झाली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...