S M L

नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने समोर आणली धक्कादायक माहिती

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2018 02:06 PM IST

नालासोपारा स्फोटक प्रकरणी एटीएसने समोर आणली धक्कादायक माहिती

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 09 सप्टेंबर : नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी एटीएस पथकाने ताब्यात घेतलेल्या वासुदेव सूर्यवंशी आणि विजय लोधी यांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. जळगावच्या साकळीमधून वासुदेव सुर्यवंशी याला एटीएसने ताब्यात घेतलं होतं. वासुदेव सूर्यवंशी सनातनचा साधक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वासुदेवच्या घराची तपासणी केल्यानंतर एटीएसकडून ही कारवाई करण्यात आली होती.

तर विजय लोधीकडून ३ गावठी बॉम्ब, २ मोबाईल, २ कार नंबर प्लेट, ४ पेन ड्राईव्ह मिळाले असल्याची माहिती एटीएसने कोर्टात दिली आहे. शस्रास्रांसोबत ज्या कारचा वापर करण्यात आला त्याची पडताळणी करायची असल्याचं एटीएसनं कोर्टात सांगितलं. तर वासुदेव सूर्यवंशीच्या घरातून १ डीव्हीडी, २ मोबाईल फोन, सिम कार्ड्स, ५ पॉकेट डायरीज मिळाल्या आहेत.स्निफर डॉगच्या मदतीने या दोघांकडील स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. ही स्फोटकं BDDS कडे देण्यात आली असून ती नेमकी कोणत्या प्रकारची आहेत त्याची तपासणी केली जाणार आहे अशी माहिती एटीएसनं कोर्टाला दिली. हे दोघेही मोठ्या कटात सहभागी असून त्यांची नेमकी काय भूमिका या सगळ्या प्रकरणांमध्ये आहे याकरता दोघांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता आहे.

आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी या दोघांनीही तीन दिवसांपूर्वीच अटक झाल्याची बातमी टीव्हीवर पाहिली असल्याचं कोर्टात म्हटलं. ते दिवसही ते कोठडीत असल्याचं गृहीत धरण्याची मागणी पुनाळेकर यांनी केली. आमच्यासमोर जी रिमांड कापी आणि पंचनामा आहे तोच आम्ही गृहीत धरणार असं कोर्टाने स्पष्ट केलं. आणि दोघांचीही रवानगी १७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत केली.

 

Loading...
Loading...

मोदी, शहा आणि अडवानी... सांगा काय सांगतेय या नेत्यांची देहबोली?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 9, 2018 02:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close