S M L

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : काय दडलंय सुधन्वाच्या लॅपटॉपमध्ये; लवकरच होणार उलगडा

या प्रकरणातला दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर याच्या घरातून एटीएसने त्याचा लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह, डोंगल यासह त्याची मोटरसायकल जप्त केली आहे.

Updated On: Aug 13, 2018 05:48 PM IST

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : काय दडलंय सुधन्वाच्या लॅपटॉपमध्ये; लवकरच होणार उलगडा

पुणे, 13 ऑगस्ट : नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात मुंबई एटीएसने सोमवारी पुण्यात मोठी कारवाई केली. या प्रकरणातला दुसरा आरोपी सुधन्वा गोंधळेकर याच्या घरातून एटीएसने त्याचा लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह, डोंगल यासह त्याची मोटरसायकल जप्त केली आहे. सुधन्वाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या या संदिग्ध साहित्यात काय दडलंय याचा शोध एटीएस घेत असून, लवकरच त्याचा उलगडा होणार असल्याची माहिती आहे.

एटीएसच्या कारवाईत वैभव राऊत कडून 20 बॉम्ब आणि 2 जिलेटनच्या कांड्या हस्तगत करण्यात आल्या होत्या. मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपाऱ्यात मोठे घातपात घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलीय. घातपाताचा मोठा कट उधळल्यानंतर मुंबई एटीएसनं वैभव राऊतसह त्याचे दोन मुख्य साथीदार सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळस्कर यांना यांना पुण्यातून अटक केली. तिघांचीही 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात एटीएसने आपली कारवाई अधिक तीव्र करत राज्यभरातून १२ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे.

नालासोपारा कारवाईनंतर एटीएसनं राज्यभर धाडसत्र सुरू करातच, अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून एक-एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. यापूर्वी एटीएसला सुधन्वा गोंधळेकरच्या पुण्यातल्या घरातून बॉम्ब बनवण्याची पुस्तके सापडली होती. आज सोमवारी त्याच्या घरातून संदिग्ध साहित्य जप्त करण्यात आलंय. सुधन्वाचा लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह, डोंगलसह त्याची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे.  सुधन्वाच्या लॅपटॉप, मोबाईल आणि पेनड्राईव्हमध्ये काय दडलंय याचा शोध एटीएस घेत असून, या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या प्रकरणात आत्तापर्यंत अटक करण्यात आलेल्या सर्वांची कसून चौकशी केली जात असून, नेमके या संपूर्ण कटाचे लक्ष्य कोण होते याचा तपास एटीएसद्वारे केला जात आहे. तसंच यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांशी या आरोपींचा काही संबंध आहे का, या दिशेनेही तपास केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 05:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close