Elec-widget

'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाड

'ती' स्फोटकं मराठा आंदोलनात घातपातासाठीच होती-जितेंद्र आव्हाड

लासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी गावटी बाॅम्ब आणि स्फोटकं सापडली होती. ही स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठीच होती असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

  • Share this:

मुंबई, 11 आॅगस्ट :  सनातनचा साधक वैभव राऊत आणि त्याच्या दोन साथीदारांकडून एटीएसने जप्त केलेले जवळ-जवळ ८ क्रूड बॉम्ब आणि ५० बॉम्ब बनवण्याची सामुग्री ही मराठा आंदोलनाच्या दरम्यान घातपात करण्यासाठीच होती असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.  महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचा हा प्रयत्न होता असा आरोपही आव्हाड यांनी केलाय. आव्हाड यांची टि्वट करून हा आरोप केलाय.

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचं तीव्र आंदोलन सुरू आहे. ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटनांचा उद्रेक झालाय. आता यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंब्र्यांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलीये. नालासोपाऱ्यात वैभव राऊतच्या घरी गावटी बाॅम्ब आणि स्फोटक सापडली होती. ही स्फोटकं मराठा आंदोलनात घातपात करण्यासाठीच होती असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

9 आॅगस्ट रोजी मध्यरात्री एटीएसने पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिमेकडील भांडार आळीत राहणाऱ्या सनातन संस्थेचे कार्यकर्ते  वैभव राऊतच्या घरी एटीएसच्या पथकाने छापा मारला. यात वैभव राऊतच्या घरात 8 देशी बॉम्ब सापडले. तर बॉम्ब बनवण्याची मोठी सामग्री पोलिसांनी जप्त केली.

वैभव राऊत यांच्या घरातून 20 देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानात बॉम्ब बनवण्याची सामग्री मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. ही सामग्री गन पावडर आणि डिटोनेटर असून त्यांच्यापासून दोन डझन हून अधिक बॉम्ब बनविण्यात येऊ शकतील.

वैभव राऊत यानेही स्फोटकं का आणि कशी जमा केली याचा आता एटीएस कसून तपास करत आहे. विशेष म्हणजे सामग्री सापडल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे. वैभव हा सनातनी विचारधारेचा असून कुठे घातपात करणार होता का याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. पण एटीएसची टीम गेल्या काही दिवसापासून सतत पाळत ठेऊन होती. आणि शेवटी गुरवारी रात्री त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर आणि नालासोपारामध्ये मोठा घातपात घडवण्याचा आरोपींचा कट होता, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिलीय. एटीएसनं अटक केलेला हिंदुत्ववादी सनातनी कार्यकर्ता वैभव राऊतला त्याच्या दोन साथीदारांसह न्यायालयात हजर केलं. यावेळी तपासयंत्रणेच्या हाती लागलेली माहिती सरकारी वकिलांना कोर्टाला सादर केली. आरोपी वैभव राऊतकडून 20 बॉम्ब आणि 2 जिलेटीन कांड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. वैभवच्या चौकशीदरम्यान ज्या दोघांची नावं समोर आली त्या शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांनाही अटक केलीय. आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तर आज नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी पुण्यातून सुधन्वा गोंधळेकरला अटक केल्यानंतर, त्याच्याशी संबंधित असल्याच्या संशयावरून पुणे एटीएसनं आणखी दोन जणांना कोंढवा आणि पर्वती इथून ताब्यात घेतलंय. त्यातील एका संशयीताचं नाव जाधव असल्याचं समजतंय. या प्रकरणी राज्यभरातून आणखी काहीजणांना एटीएस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

 

संबंधीत बातम्या

मुंबईत बॉम्बची फॅक्टरी, कोण आहे वैभव राऊत?

खळबळजनक खुलासा : 'मुंबई, पुणे, सातारा हिंदु्त्ववाद्यांच्या रडारवर', 20 बॉम्ब जप्त

नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण - आणखी दोन जण एटीएसच्या ताब्यात

कट्टर 'सनातन' कायम संशयाच्या भोवऱ्यात का असते?

हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2018 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...