सावधान... 'ब्लू व्हेल' गेममुळे नागपूरात मुलीची आत्महत्या!

सावधान... 'ब्लू व्हेल' गेममुळे नागपूरात मुलीची आत्महत्या!

केंद्र सरकारनं या गेमवर या आधीच बंदी घातली आहे. देशभरात या गेमच्या आहारी जाऊन अशा प्रकारच्या काही घटना या पूर्वीही घडल्या आहेत.

  • Share this:

नागपूर 6, डिसेंबर : 'ब्लू व्हेल' या मोबाईलवरच्या जीवघेण्या खेळाने नागपूरात एका 17 वर्षांच्या तरूणीचा जीव घेतलाय. खेळाचं टास्क पुर्ण करण्यासाठी या मुलीने मुलीने आपला हात कापून गळफास घेतल्याचं उघड झालंय. मानसी जोनवाल असे या  मुलीचे नाव असून तीचे वडील एअर फोर्समध्ये हवालदार आहेत. मागच्या तीन महिन्यापासून मानसी 'ब्लू व्हेल'  गेम खेळत होती.


केंद्र सरकारनं या गेमवर या आधीच बंदी घातली आहे. देशभरात या गेमच्या आहारी जाऊन अशा प्रकारच्या काही घटना या पूर्वीही घडल्या आहेत.  पोलीस या प्रकरणात पुढचा तपास करत असल्याची माहिती डीसीपी निलेश भरणे यांनी दिलीय.

जगभरात 'ब्लू व्हेल' या गेमने अनेक किशोर वयातील मुलांचा जीव घेतलाय. 2015 -2016 या एका वर्षातच 130 मुलांनी आत्महत्या केली. या खेळात शेवटी जो मृत्यूला कवटाळतो तो विजयी होतो.


भारतासाठी धोक्याची घंटा

मुंबईतही  काही महिन्यांपूर्वी एका 14 वर्षांच्या मुलानं याच 'ब्लू व्हेल चॅलेन्ज' गेममुळं आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. ब्लू व्हेल चॅलेन्ज या गेममुळे झालेली भारतातील ही पहिलीच आत्महत्या होती. ही आत्महत्या त्यानं ब्लू व्हेल गेमच्या पन्नासाव्या टास्कमुळे केल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलं होतं. त्याने आत्महत्या करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा  गुगलवर शोधही घेतला होता असंही स्पष्ट झालं होतं.


ब्लू व्हेल गेम कसा झाला सुरू ?


ब्लू व्हेल चॅलेंज हा गेम जगभर पसरलाय आणि आतापर्यंत 19 देशात 200 मुलांचे जीव या देशाने घेतले आहेत. यातले 130 मृत्यू रशियातच झाले आहेत. अमेरिका आणि आफ्रिकेतही अनेकांचे जीव गेले आहेत. द ब्लू व्हेल गेम'ला 25 वर्षांच्या के. फिलीप बुडेकिन या तरुणाने 2013 साली बनवला होता. रशियामध्ये 2015 साली या गेमने पहिला बळी घेतला. त्यानंतर फिलीपला तुरूंगवास ठोठावण्यात आला होता. फिलीपच्या मते हा गेम समाजातील बायोलॉजिकल कचऱ्याच्या साफसफाईसाठी आहे. जे लोकं आत्महत्या करतात ते बायॉलोजिकल वेस्ट असतात असं फिलीपचं म्हणणं आहे.


हा गेम  नक्की काय आहे ?

हा गेम किशोरांना टास्क पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त करतो. या गेममध्ये टास्कची सिरीज असते. हे टास्क 50 दिवसांत पूर्ण करायचे असतात. 'अ साइलेंट हाऊस', 'अ सी ऑफ व्हेल्स' आणि 'वेक अप मी एट 4.20 ए एम' असे या टास्कची नावं असतात आणि शेवटी जो मृत्यूला कवटाळतो तोच जिंकतो.


गेमची सुरूवात

हा गेम व्हीकोन्टाक्टे नावाच्या रशियन साईटवर खेळला जातो. रशियानंतर या गेमने भारत अमेरिका आणि युरोपला टार्गेट केलं होतं. या गेमचे सूत्रधार डेथ आणि सुसाईड ग्रुप्सच्या माध्यमातून या मुलांना शोधतात. रशियातले असे अनेक ग्रुप्स सरकारने बंद केले आहेत. पण एक डिलीट केल्यावर लगेच दुसरा ग्रुप तयार केला जातो. तसंच आपण टास्क पूर्ण केलंय हे दाखवायला फोटो ही पाठवावे लागतात.


इन्स्टाग्रामने या गेम विरूद्ध पाऊलं उचललं


दोन रशियन मुलांनी इन्स्टाग्रामवर या गेमचे फोटो पोस्ट केल्यानंतर हा गेम बातम्यांमध्ये आला होता. त्यामुळे इन्स्टाग्रामने या गेम विरूद्ध पाऊलं उचलली आहेत. आता या गेमचे फोटो टाकत असल्यास इन्स्टाग्रामवर वॉर्निंगही येते.


या गेमच्या विळख्यात कोण येऊ शकतं ?


जे सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा प्रचंड वापर करतात


जे इंटरनेट गेमिंग अॅडिक्ट आहेत. हा गेम खेळू लागल्यानंतर माणूस चिडचिडा आणि उदास होतो. जर मुलात हे बदल दिसत असतील तर लगेच काळजी घेतली पाहिजे.


या गेमवर उपाय काय?


- मानसोपचार तज्ज्ञांकडे नेऊन मुलांचं काउंसिलिंग केलं पाहिजे.


- पालकांनी मुलासोबत जास्त वेळ घालवत आपलं नातं घट्ट बनवलं पाहिजे.


- मुलांना मोबाईलपासून दूर करण्यासाठी उपाय करा.


- एकदम जबरदस्ती न करता पहिले दिवसातले गेम खेळण्याचे तास कमी करा


- त्यानंतर गेम खेळण्याची सवय आठवड्यातून एकदा खेळण्यापर्यंत आणली जाते आणि अखेर ही सवय मोडली जाते

VIDEO: 'साताऱ्यात फक्त मीच चालतो'च्या डायलॉगवर उदयनराजेंचे कार्यकर्ते भडकले, निर्मात्याची गाडी फोडली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2018 05:38 PM IST

ताज्या बातम्या