S M L
Football World Cup 2018

नागपुरात अवकाळी पावसामुळे तूर भिजली, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेली तुर, गहू, सोयाबीन आणि चण्याचे हजारो पोती पावसामुळे भिजली आहे.

Sachin Salve | Updated On: May 4, 2017 07:26 PM IST

नागपुरात अवकाळी पावसामुळे तूर भिजली, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

04 मे : नागपूर जिल्ह्याला काल बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढलं.  त्यामुळे कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणलेली तुर, गहू, सोयाबीन आणि चण्याचे हजारो पोती पावसामुळे भिजली आहे.

शेकडो क्विंटल शेतमाल या पावसामुळे भिजला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दर वेळेस अवकाळी पावसामुळे असेच धान्य भिजत असतांना कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही.  आधीच तूर खरेदी होत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.

दरम्यान, आजही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.

विदर्भात गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर , अमरावती या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मोदा या तालुक्यांत मध्यरात्री अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 4, 2017 07:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close