S M L

मुख्यमंत्र्यांच्याच शहरात भरचौकात वाहतूक पोलिसालाच मारहाण

आता तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात पोलिसावर हात उचलला गेलाय.

Sachin Salve | Updated On: Aug 2, 2017 06:25 PM IST

मुख्यमंत्र्यांच्याच शहरात भरचौकात वाहतूक पोलिसालाच मारहाण

02 आॅगस्ट : राज्यात पोलिसांवरचे हल्ले काही कमी होत नाहीयेत. आता तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात पोलिसावर हात उचलला गेलाय.

नागपूर शहरातील रिझर्व्ह बँक चौकात हेल्मेटसक्तीची तपासणी सुरू असताना २ जणांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केली. संदीप इंगोले असं मारहाण झालेल्या कॉन्स्टेबलचं नाव आहे, तर आरोपीचं नाव आहे समय मारावार. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच नागरिकांना पोलिसांचा धाक किंवा वचक राहिलेला नाही. पोलीसच सुरक्षित नसतील, तर नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना कशी निर्माण होणार  हा खरा सवाल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2017 05:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close