News18 Lokmat

केळीच्या बागेत वाघोबाचा ठिय्या, रानडुक्कर केलं फस्त !

जंगलालगत शेत असल्यानं शिकार करताना तो तिथपर्यंत पोहचला. मात्र, या वाघानं कुणालाही इजा पोहचवली नाहीय

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2018 04:24 PM IST

केळीच्या बागेत वाघोबाचा ठिय्या, रानडुक्कर केलं फस्त !

नागपूर, 24 एप्रिल : जिल्ह्याच्या बोर अभयारण्यालगत असलेल्या सावंगी-देवळी गावातील शेतात वाघ शिरलाय. एका केळीच्या शेतात या वाघानं रानडुक्कराची शिकार केलीय. त्यामुळे तो शेतात ठाण मांडून बसलाय.

शेतात वाघ शिरल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी वाघाला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे वन विभाग आणि पोलीस या गावात पोहचले.

जंगलालगत शेत असल्यानं शिकार करताना तो तिथपर्यंत पोहचला. मात्र, या वाघानं कुणालाही इजा पोहचवली नाहीय. गावकऱ्यांच्या गर्दी आणि ओरडन्यामुळे वाघ घाबरलाय. त्यामुळे त्याला जेरबंद न करता परत त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठविण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2018 05:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...