नागपुरात शाळकरी मुलांच्या जिवाशी शिक्षण संस्थेचा खेळ

नागपुरात शाळकरी मुलांच्या जिवाशी शिक्षण संस्थेचा खेळ

मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेने विविध प्रयोग करणं अपेक्षीत आहे. मात्र नागपुरच्या एका शाळेच्या व्यवस्थापनाने पैसे कमविण्यासाठी मुलांच्या आरोग्याशीच खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

  • Share this:

हर्षल महाजन, 10 जुलै : मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेने विविध प्रयोग करणं अपेक्षीत आहे. मात्र नागपूरच्या एका शाळेच्या व्यवस्थापनाने पैसे कमविण्यासाठी मुलांच्या आरोग्याशीच खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

नागपूरमधल्या हुडकेश्वर रोडच्या बाजूला असलेल्या "साकेत कॉन्व्हेंट स्कूलच्या इमारतींवर" संस्था चालकांच्या संमतीने एक भला मोठा मोबाईल टॉवर उभारण्यात आलाय. या माध्यमातून शाळेचे संचालकांना उत्पन्न मिळणार आहे. मात्र या टॉवरमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होऊ शकतात याकडे मात्र त्यांनी डोळेझाक केलीय.

नियमांची पायमल्ली

विशेष म्हणजे शिक्षण हक्क कायदा 2009 च्या कलम 9मध्ये नमूद केल्याप्रमाणं शालेय इमारतीची देखभाल करणे व शालेय इमारतीचा परिसर फक्त शाळेसाठी वापरला जावा आणि तिचे संरक्षण करावे असा स्पष्ट उल्लेख आहे. पण साकेत कॉन्व्हेंट स्कूल मध्ये शाळेच्या इमारतीचा वापर उत्पन्न मिळविण्यासाठी करण्यात येतोय. त्यासाठी विद्यार्थ्यांना धोकादायक ठरेल अशा गोष्टी केल्या जाताहेत.

पवारांच्या आणखी एका शिलेदाराने सोडली साथ, आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

मोबाईल टॉवर उभारण्यावरून कायम वाद होत असतात. त्याच्या दुष्परीणामांबाबतही अनेक वाद आहेत. त्याबाबात ठोस निष्कर्ष जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे चक्क शाळेच्या ठिकाणी असे टॉवर उभारण्यास आक्षेप घेतला जातोय. असे टॉवर उभे राहतात त्याच्या 300 ते 400 मीटर अंतरावर 7 ते 8 हजार मायक्रोव्हेंटचे रेडिएशन पसरते. या ठिकाणी आधी सर्वत्र जास्त प्रमाणात पक्षी उडताना दिसायचे पण टॉवर च्या रेडिएशन मुळे त्यांचे प्रमाणही कमी झाले आहेत, कारण टॉवर च्या रेडीएशन मुळे पक्षांवर जास्त परिणाम होत असतो असं सांगितलं जातं.

अधिकाऱ्यांची डोळेझाक

या तीव्र रेडिएशनचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावरही होतात. गर्भवती महिलांवर त्याचा परिणाम होतो. डोके दुखणे, अशक्तपणा, चिडचिड या समस्या संशोधनातून अनुभवायला आल्याचं काही तज्ज्ञांचं मत आहे. यामुळे अनेक आजारांना बळी पडावं लागतं असंही मत रेडिएशन तज्ज्ञ गौरव सव्वालाखे यांनी व्यक्त केलंय.

VIDEO: प्रेयसीची हत्या करणाऱ्या तरुणाला स्थानिकांकडून बेदम मारहाण

विशेष म्हणजे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी शाळांना भेटी देणे आवश्यक आहे. पण या अधिकाऱ्यांनाही कधी टॉवरच्या बाबतीत गांभीर्य लक्षात आले नाही असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतय. तर शाळा प्रशासनाकडून कोणतेही कर्मचारी यावर बोलण्यास तयार नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 04:52 PM IST

ताज्या बातम्या