नागपूर-सावनेर हायवेवर अपघातानंतर गावकऱ्यांनी पेटवली बस

नागपूर-सावनेर हायवेवर अपघातानंतर गावकऱ्यांनी पेटवली बस

नागपूर-सावनेर हायवेवर खासगी बसने आॅटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय.

  • Share this:

29 जुलै : नागपूर-सावनेर हायवेवर खासगी बसने आॅटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी खासगी बस पेटवून दिली.

ऑटो क्र. MH 40 1392 ही सावनेरवरुन माळेगावला जात होता. रिक्षा माळेगावजवळ स्टॉपवर पोहचली असता रिक्षाचालकने रिक्षा उजवीकडे वळवली असता नागपूरकडून मिगलानी ट्रॅव्हल्सची येणाऱ्या खासही बसने रिक्षाला सरळ धड़क दिली.

हा अपघात इतका भीषण होता की यात जागेवरच दोघांचा मृत्यू झाला. तर एका जखमीचा मृत्यू शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. या अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी बस पेटवून दिली. अग्निशमन दलाची घटनास्थळी पोहचली असता गावकऱ्यांनी दगडफेक करून अग्निशमन दलाची गाडी रोखून धरली होती.

या अपघातात कमलाबाई मधुकर पालेकर वय 75, उमेश विनायक दहीकर 25 ,ऑटो चालक गजानन चांदुरकर वय 40 या तिघांचा मृत्यू झालाय. तर जखमीमध्ये बाल्या मधुकर पालेकर 40, अर्चना राजेंद्र पालेकर 35, कुमार पारस राजू पालेकर 5 आणि सुनील चांदुरकर वय 25 यांचा समावेश आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2017 11:37 PM IST

ताज्या बातम्या