नागपूरमध्ये मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याकडे गोमांसच, होणार अटक

तरीही सलीमला झालेल्या मारहाणीचं समर्थन होऊच शकत नाही, अशी आयबीएन लोकमतची स्पष्ट भूमिका आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2017 08:25 PM IST

नागपूरमध्ये मारहाण झालेल्या भाजप कार्यकर्त्याकडे गोमांसच, होणार अटक

15 जुलै : नागपूरमध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून सलीम इस्माईल शहा याला तथाकथिक गोरक्षकांनी मारहाण केली होती. पण सलीमकडे असलेलं मांस हे गोमांसच होतं, असं आता फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झालंय. मात्र,तरीही सलीमला झालेल्या मारहाणीचं समर्थन होऊच शकत नाही, अशी आयबीएन लोकमतची स्पष्ट भूमिका आहे.

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील भारसिंगी येथे गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून  सलीम इस्लाईल शहा ला भारसिंग बसस्टाॅपसमोर जात असताना चार जणांनी अडवलं. आणि भररस्त्यावर बेदम मारहाण केली.

या मारहाणीच्य प्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली. सलीमवर उपचार करून घरी सोडण्यात आलंय. सलीमकडे जे मांस होतं त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली. त्यात ते मांस गोमांस असल्याचं स्पष्ट झालं.

ते गोमांस असलं हे जरी स्पष्ट झालं असलं तरी सलीमला मारहाण करणं याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही.  तथाकथित  गोरक्षकांनी मारहाण न करता पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती, पोलिसांनी पुढची कारवाई केली असती, अशी आमची भूमिका आहे. मात्र, आता गोमांस विक्री कायद्यानेच बंद असल्यामुळे उपचार पूर्ण झाल्यावर गोवंश हत्या कायद्यांन्वये सलीमला पोलीस अटक करणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2017 07:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...