S M L

आमदार नितेश राणे, प्रताप सरनाईकांनी राजदंड पळवला, 'नाणार'वरून विधानसभेत गोंधळ

संभाजी भिडे यांच्या अटकेवरून राष्ट्रवादी आमदार आक्रमक झाले

Updated On: Jul 11, 2018 05:08 PM IST

आमदार नितेश राणे, प्रताप सरनाईकांनी राजदंड पळवला, 'नाणार'वरून विधानसभेत गोंधळ

नागपूर, ता. 11 जुलैः नागपूरमध्ये सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आज दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. नाणार प्रकल्पावरून झालेल्या गोंधळात सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदाराने राजदंडपळवण्याची अभूतपूर्व घटनाही आज विधानसभेत घडली. हा गोंधळ होत असतानाच त्यात काँग्रेसचे आमदार नितेश राणेही सहभागी झाले. आमदारांनी राजदंड खाली नेल्यावर चोपदारांनी या आमदारांकडून राजदंड काडून घेण्यात यश मिळवलं. वाढत जाणाऱ्या गोंधळात कामकाज करणं शक्य नसल्यामुळे अखेर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. सध्या संभाजी भिडे यांच्या अटकेवरून राष्ट्रवादी आमदार आक्रमक झाले असून नाणार प्रकल्पावर आमजार नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राजदंड पळवून नेला. तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानपरिषदेत गोंधळ घालून परिषद बंद करायला भाग पाडलं.

समलैंगिकता गुन्हा की अधिकार याचा निर्णय सुप्रीम कोर्टानच घ्यावा - केंद्राची भूमिका

पोलिसांनी साजरा केला 3 मुलींच्या बलात्काराचा आनंद, गावाला मटनाची दावत

शिवसेनेने आपल्या कृतीचे समर्थन करताना आमदार सुनील प्रभू म्हणाले की, 'प्रत्येक सदस्याला सभेत बोलण्याचा अधिकार आहे. मात्र अध्यक्षांनी तो अधिकार नाकारला. नाणार प्रकल्पामुळे कोकणाचा विनाशच होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे आणि तो पुढेही असाच राहील.'

व्यवसाय आणि उद्योगधंद्यामध्ये आंध्र प्रदेश नंबर वन आणि महाराष्ट्र थेट !

Loading...
Loading...

'शिवसेने या प्रकल्पाचा नेहमीच विरोध करत राहील यात काही शंका नाही. हजारो शेतकरी आज विधानसभेच्या बाहेर त्यांच्या व्यथा सांगण्यासाठी उभे आहेत. त्यांची व्यथा कोणी ऐकून घेतली नाही. शेवटी आम्ही शिवसेना स्टाईलने राजदंड पळवला. शेतकऱ्यांसाठी 10 वेळा जरी निलंबित केले तरी आम्ही त्यासाठी तयार आहोत असे मत, आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडले.'

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 04:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close