नागपूर राहुल आग्रेकर हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

त्याला कोलकात्याहून नागपूर पोलिसांनी ताब्यात केली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2017 10:03 AM IST

नागपूर राहुल आग्रेकर हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

30 नोव्हेंबर : नागपूर लाॅटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर अपहरण आणि खून प्रकरणातील प्रमुख आरोपी पंकज हारोडेला अटक करण्यात आलीये. त्याला कोलकात्याहून नागपूर पोलिसांनी ताब्यात केली आहे.

नागपुरात अपहरण केलेल्या राहुल आग्रेकर या लॉटरी व्यापाऱ्याची जाळून हत्या करण्यात आली होती. 1 कोटी रूपयांच्या खंडणीसाठी 21 नोव्हेंबर 2017 रोजी  राहुल यांचं अपहरण करण्यात आलं होतं. आरोपींनी कुटुंबियांना फोन करून 1 कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी राहुल यांच्या शोधासाठी पथकं पाठवली होती.

दरम्यान, बुटीबोरी येथे जळालेला मृतदेह मिळाला होता. हा मृतदेह राहुल आग्रेकर यांचाच असल्याचं स्पष्ट झालंय. या प्रकरणी लॉटरी सेंटर चालविणाऱ्या आणि राहुल यांचा मित्र असलेल्या दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडे या दोन संशयित आरोपींचा पोलिसांनी सोध सुरू केला.

या दोघांसोबत बोलेरो वाहनातून राहुल गेले होते. नंतर बुटीबोरी भागात त्यांची हत्या करण्यात आली. अखेर या प्रकरणी मध्यप्रदेश व्हाया कोलकाता असा प्रवास माग काढत पोलिसांनी मुख्य आरोपी पंकज हारोडेच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आणखी एक आरोपी दुर्गेश बोकडे अजूनही फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 10:03 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...