गुन्हेगारांना शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचा 'हायटेक' फंडा

गुन्हेगारांना शोधण्यासाठी नागपूर पोलिसांचा 'हायटेक' फंडा

'क्रिमिनल सर्च App'मध्ये पोलिसांनी शहरातील सर्व गुन्हेगारांच्या कुंडल्या फिड केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना गुन्हेरांची माहिती मिळेल आणि गुन्हेगारांवरही वचक राहिल

  • Share this:

हर्षल महाजन, नागपूर 28 जून : वाढत शहरीकरण आणि देशभरातून येणाऱ्यांचा वाढता लोंढा यामुळं नागपूर शहर गुन्हेगारांचा अड्डा झालाय. चोरी, दरोडे, बलात्कार, क्रीकेट सट्टा, जुगार, छेडखानी अशा गुन्ह्यांची संख्या दररोज वाढतेय. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलीसांनी शहरातील सर्व गुन्हेगारांना एका Appमध्ये डांबलंय. या Appमध्ये पोलिसांनी शहरातील सात लाख गुन्हेगारांचा डेटा फिड केलाय. त्यामुळं नागरिकांना सर्व गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळ्यासाठी नागपूर पोलिसांनी एक App तयार केलंय. या 'क्रिमिनल सर्च App'मध्ये पोलिसांनी शहरातील सर्व गुन्हेगारांच्या कुंडल्या फिड केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना गुन्हेरांची माहिती मिळेल आणि गुन्हेगारांवरही वचक राहिल अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निलेश भरणे यांनी दिली. नागपूर पोलसांनी तयार केलेल्या या Appमुळे गुन्हेगारांवर तात्काळ कारवाई होण्यास मदत होईल असंही ते म्हणाले.

काय आहे या Appमध्ये

- सातलाख पेक्षा जास्त गुन्हेगार आणि गुन्ह्यांचा डेटा

- उघडकीस आलेल्या गुन्ह्याची नोंद

- सतत गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचं रेकॉर्ड

- गुन्हेगारांचे नातेवाईक आणि मित्रांचा डेटा

- फरार आरोपींचं संपूर्ण रेकॉर्ड

- गुन्हागारांच्या बँक खात्याची माहिती

- गुन्हेगारांचा आधार डेटा

गुन्हेगार हे अतिशय चतुर असतात. अनेक गुन्ह्यांमध्ये ते हायटेक तंत्राचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनाही बदलणं भाग असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. त्यामुळच नागपूर पोलिसांनी हा नवा प्रयोग केलाय. हा राज्यातला पहिलाच प्रयत्न असल्याचा दावाही नागपूर पोलिसांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 04:26 PM IST

ताज्या बातम्या