S M L

पोलीस काॅन्स्टेबल आॅन ड्युटी फुल टाईट, नागरिकांना केली शिवीगाळ

Sachin Salve | Updated On: May 11, 2017 12:10 AM IST

पोलीस काॅन्स्टेबल आॅन ड्युटी फुल टाईट, नागरिकांना केली शिवीगाळ

10 मे : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये जिथे एकीकडे सुऱक्षा व्यवस्थेचा पालापोचाळा झालाय तिथेच दुसरीकडे जनतेचं रक्षण करणारे पोलीस स्वत: दारूच्या नशेत नागरीकांना अतिशय असभ्य शब्दात शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद झाले.

नागपूरमधील काटोल परिसरातील पोलीस हेड क्वॉटर जवळचा एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओ पोलीस काँन्स्टेबल मंगेश डबाळे दारू पिऊन तरार्ट झाले. या पोलीस काँन्स्टेबलने एवढी प्यायली होती की याला नीट उभाही राहता येत नव्हतं. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करून या दारूड्या पोलिसाला पोलिसांच्याच स्वाधीन केलं. बरं एवढं होऊन सुद्धा हे महाशय आॅन ड्युटी पिणारच असंही बोलून दाखवता. पोलीस स्वत: आरोपींवर कारवाई करुन जनतेला न्याय देण्यास स्वत:चा मोठा सहयोग देतात. मात्र या पोलिसावर आता काही कारवाई होतेय का ? असा प्रश्न येथे उपस्थित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 11, 2017 12:10 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close