प्रविण मुधोळकर, नागपुर २१ सप्टेंबर- एकतर्फी प्रेमातून माथेफिरूने केलेल्या चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सानिका प्रदीप थुगांवकर या अठरा वर्षांच्या मुलीचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. १ जुलैला रात्री ७.४५ च्या सुमारास अत्यंत वर्दळीच्या आठ रस्ता चौकाजवळ ही थरारक घटना घडली होती. तेव्हापासून सानिका मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा संघर्ष आज संपला.
टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षाला शिकणारी सानिका अशोका हॉटेलसमोर असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएमलगत तिच्या मामाच्या (अविनाश पाटणे) फायनान्स कार्यालयात काम करायची. खामल्यातील रोहित हेमनानी या माथेफिरूसोबत तिचे दोन वर्षांपासून मित्रत्वाचे संबंध होते. काही दिवसांपूर्वी त्याची गुन्हेगारी वृत्ती लक्षात आल्याने त्याला सानिकाने टाळणे सुरू केले. त्यामुळे आरोपी संतापला होता. ब्रेकअप करण्यापूर्वी शेवटचे एकदा भेटू असे म्हणून आरोपी हेमनानीने तिला गळ घातली होती. त्यामुळे तिने त्याला १ जुलैला रात्री मामाच्या ऑफिसामध्ये भेटायला बोलवले होते.
रोहित- सानिकाची भेट झाल्यानंतर रोहितने पँटमध्ये लवपून ठेवलेला चाकू बाहेर काढून अचानक सानिकावर चाकूचे सपासप वार केले. छातीवर, पोटावर आणि पाठीवर चाकूचे घाव बसल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तेव्हापासून सानिकावर खामल्यातील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या सानिकाच्या आई वडिलांनी पावणेतीन महिन्यात होते नव्हते विकून, कर्जबाजारी होऊन उपचाराचा खर्च केला. सानिकानेही तब्बल पावणेतीन महिने जगण्या- मरण्याची लढाई लढली मात्र आज अखेर तिचा संघर्ष थांबला.
VIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा