S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात प्रशासनाचे तीनतेरा, महत्वाच्या पदांवर सनदी अधिकारीच नाहीत!

उपराजधानी नागपुरात महत्वाच्या पदावर सनदी अधिकारी नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.

Updated On: Oct 8, 2018 10:07 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात प्रशासनाचे तीनतेरा, महत्वाच्या पदांवर सनदी अधिकारीच नाहीत!

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 8 ऑक्टोबर : उपराजधानी नागपुरात महत्वाच्या पदावर सनदी अधिकारी नसल्याचे वास्तव पुढे आले आहे. आर्थिक संकटात असलेल्या मनपाचे आयुक्त महिनाभरापासून सुट्टीवर आहे. नागपुर सुधार प्रन्यासच्या सभापती पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. तर नागपूर मेट्रो रिजन डेव्हलमेंट अथोरिटीच्या आयुक्तपदी अद्याप कुणीच नाही. अशी परिस्थीती मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरातच असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पावसाळ्यात नागपुरातल्या रस्त्यांची अक्षरशा चाळण झालीय, तर दुसरीकडे डेंग्युने शहरात थैमान घातलंय. पण शहरातील नागरिकांच्या स्वच्छता, पाणी, रस्ते आणि आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त विरेंद्र सिहं महिनाभऱ्यापासून सुट्टीवर आहे. हीच सर्व जबाबदारी असणारी उपराजधानीतील दुसरी स्थानिक स्वराज संस्था नागपूर सुधार प्रन्यासलाही अनेक महिन्यांपासून स्वतंत्र सभापती नाही. एकंदर अशी परिस्थीती असतांना नागपुरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्यावर पाच विभागांची जबाबदारी आहे.

राज्याची उपराजधानी खऱ्या अर्थाने राजधानी कऱण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आणि नितीन गडकरी केंद्रीय दळणवळण मंत्री झाल्यानंतर हजारो कोटींचे विकासाचे प्रकल्प सुरु झाले. पण विकासाच्या योजना पुर्ण करण्याची आणि ती चालविण्याची जबाबादारी असणाऱ्या खात्यांनाच अधिकारी नसल्याने सरकाराची अनास्था दिसतेय, असे महापालिकेचे सत्तापक्ष नेता संदीप जोशी म्हणाले.राज्यातील अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे योग्य तो विभाग नसल्याबद्दल त्यांच्यात नाराजी आहे. दर दुसरीकडे उपराजधानीतच अशा महत्वाच्या पदांवर अधिकारी नाहीत. मिनिमम गर्वमेंट मँक्सिमम गर्वनंस असा आदर्श सांगणाऱ्या भाजपच्याच काळात उपराजधानीत अधिकारी नाही. राज्यातील अधिकारी संपले की मर्जीतले अशी कुजबुजही या निमित्ताने होऊ लागली आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी वाहताहेत या पाच खात्यांचा भार..

1) नागपूर महानगर विकास प्राधिकरण म्हणजेच 'एनएमआरडीए'च्या आयुक्तपदाची जबाबदारीही.

2) नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती पदाची जबाबदारीही जिल्हाधिकाऱ्यांकडेच.

3) 'एमएडीसी' महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलमेंट अर्थोरिटीच्या सहव्यवस्थापकीय संचालक म्हणूनही जबाबदारी.

4) नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचीही जबाबदारीही मुद्गल यांच्यावरच आहे.

5) विद्यमान विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्यामुळे या पदाचा अतिरिक्त भार मुद्गल यांच्यावरच सोपविण्यात आला आहे.

 उत्तराखंड ते नागपूर, कोण आहे हा एजंट निशांत?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 10:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close