नागपुरात गडकरींविरोधात उभे ठाकणार का आशिष देशमुख?

नागपुरात गडकरींविरोधात उभे ठाकणार का आशिष देशमुख?

भाजप आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्याची बातमी आहे. ते नागपूरहून वर्ध्याच्या दिशेने निघाले आहे आणि राहुल गांधींच्या सभेलाही उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

  • Share this:

नागपूर, 02 ऑक्टबर: भाजप आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्याची बातमी आहे. ते नागपूरहून वर्ध्याच्या दिशेने निघाले आहे आणि राहुल गांधींच्या सभेलाही उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे.

डॉ. देशमुख गेले अनेक महिने पक्षावर नाराज होते. ते सरकारविरोधात उघड उघड नाराजी व्यक्तही करत होते. अनेक महिने खासदारकीचं तिकिट मिळावं यासाठी आशिष देशमुख प्रयत्नशील होते. आता नितीन गडकरी यांच्यासारख्या तगड्या नेत्याला टक्कर द्यायला देशमुख यांच्यासारखा नवखा उमेदवार काँग्रेस देणार का हा प्रश्नच आहे.

आशिष देशमुख यांची पुढची वाटचाल काय असणार याचे संकेत स्पष्ट झालेत. पण तरीही त्यांना काँग्रेस नेमकं काय देणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. २०१४ची नागपूर लोकसभा निवडणूक काँग्रेसने विलास मुत्तेमवारांना तिकिट दिलं होतं. त्यांनी गडकरी यांना चांगली टक्कर दिली होती. पण शेवटी गडकरी २ लाखांच्या फरकाने विजयी झाले होते.

भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज ई-मेल आणि फॅक्सने राजीनामा मुंबईला पाठवला आहे. तर उद्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना ते प्रत्यक्ष भेटून राजीनामा सोपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तर गेल्या काही दिवसांआधी आशिष देशमुख यांनी स्वपक्षाविरोधातच जोरदार फटकेबाजी केली होती. 'अच्छे दिन आता जाणार आहे' असे म्हणत देशमुख यांनी भाजपविरोधात उघड बंड पुकारले होते. या महोत्सवात देशमुख मोठी घोषणा करण्याची शक्यता होती, पण भाजपचा राजीनामा देणार होतो पण शतृघ्न सिन्हा यांनी सांगितल्यामुळे मी माझा निर्णय मागे घेतल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.

 

लष्कराची बुलेटवर चित्तथरारक प्रात्यक्षिकं, पाहून थक्क व्हाल : VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2018 02:27 PM IST

ताज्या बातम्या