साक्षात भाजपचेच आमदार म्हणाले 'आता अच्छे दिन जाणार'!

साक्षात भाजपचेच आमदार म्हणाले 'आता अच्छे दिन जाणार'!

नागपूर-काटोल महोत्सवात भाजप आमदार आशिष देशमुख यांनी 'अच्छे दिन आता जाणार आहे' असे म्हणत भाजपविरोधातच उघड बंड पुकारले आहे.

  • Share this:

नागपूर, 22 सप्टेंबर : नागपूर-काटोल महोत्सवात भाजप आमदार आशिष देशमुख यांनी स्वपक्षाविरोधातच जोरदार फटकेबाजी केली. 'अच्छे दिन आता जाणार आहे' असे म्हणत देशमुख यांनी भाजपविरोधात उघड बंड पुकारले आहे. या महोत्सवात देशमुख मोठी घोषणा करण्याची शक्यता होती, पण भाजपचा राजीनामा देणार होतो पण शत्रृघन सिन्हा यांनी सांगितल्या मुळे मी माझा निर्णय मागे घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा, संजय सिंग यांनी या महोत्सवात उपस्थिती लावली आहे. 'मेक इन इंडिया', 'मॅग्नेटिक महाराष्ट्र', 'स्टॅन्ड अप इंडिया', 'स्किल इंडिया' असे अनेक शब्द आम्ही ऐकले. मात्र यांचा काहीही फायदा झाला नसल्याचे देशमुख म्हणाले. '२०१४ नंतर अपेक्षा होती, की युवकांना रोजगार मिळेल. २ कोटी रोजगाराचे आश्वासन दिले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात सव्वादोन लाखच रोजगार निर्माण झाले,' अशी टीका देशमुख यांनी केली.

नागपूरचे नेते म्हणतात (गडकरींचे नाव न घेता) त्यांनी ५० हजार रोजगार दिले. मात्र, नागपुरमधील मिहान आणि कुठल्याही एमआयडीसीमध्ये नवे कारखाने आलेले नाहीत, असेही देशमुख म्हणाले.

VIDEO : विश्वास नांगरे पाटलांनी डीजेविरोधात कारवाई करण्याचे दिले संकेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2018 11:03 PM IST

ताज्या बातम्या