News18 Lokmat

नागपूरमध्ये 10 दिवसांत 9 हत्या; नागरिक संतप्त

जिल्ह्यात होणाऱ्या या सततच्या हत्येच्या सत्रामुळे नागपूरमधील कायदा आणि सुव्यस्थेवर सर्वसामान्य लोकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. नागपूरमध्ये 9 दिवसात तब्बल 6 जणांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: May 6, 2018 11:58 AM IST

नागपूरमध्ये 10 दिवसांत 9 हत्या; नागरिक संतप्त

06 मे:   नागपूरमध्ये आज पुन्हा एकाचा खून झाल्याची घटना झालीय. अनिकेत भेंडारकर याची हत्या झालीय. दुबे नगरमध्ये झालेल्या या खूनाच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोषाचं वातावरण आहे.  दरम्यान गेल्या 10 दिवसांत नागपूरमध्ये 9 जणांची हत्या झाली.

जिल्ह्यात होणाऱ्या या सततच्या हत्येच्या सत्रामुळे नागपूरमधील कायदा आणि सुव्यस्थेवर सर्वसामान्य लोकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. नागपूरमध्ये 9 दिवसात तब्बल 6 जणांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्या आहेत. नागपूर हुडकेश्वर परिसरात आणखी एकाचा खून आज झालाय.  दुबे नगरात खूनाच्या घटनेने लोकांमध्ये रोष आहे. शहरात ३ तारखेला भरदिवसा रामनगर परिसरात शौचालय कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती.  त्याच रात्री एमआयडीसी पोलीस स्थानक हद्दीत श्रीकांत गुहे या तरुणाची हत्या झाली, त्याच्या ६ दिवस आधी हत्येच्या २ घटना शहरात घडल्या होत्या. अशा 9 दिवसांत नागपूर जिल्ह्यात तब्बल 6 हत्येच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील या हत्येच्या सत्रामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरच सर्वसामान्य लोकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

नागपूरमध्ये  याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत . त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला पायबंद कसा घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2018 11:49 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...