News18 Lokmat

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे डबे रूळावरून घसरले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिंद- आसनगाव या दोन स्टेशन दरम्यान दुरांतोचे इंजिनसकट नऊ डबे रूळावरून घसरले

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2017 10:21 AM IST

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे डबे रूळावरून घसरले

29 ऑगस्ट:उत्तर प्रदेशमध्ये ट्रेन रूळावरून घसरल्याच्या दोन घटना घडल्यानंतर आता महाराष्ट्रातही अशीच एक घटना घडली आहे. नागपूर-मुंबई दुरांतो आज रूळावरून घसरली असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

आज सकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार  वाशिंद- आसनगाव या दोन स्टेशन दरम्यान दुरांतोचे  इंजिनसकट नऊ डबे रूळावरून घसरले. दुरांतोचे 7 डबे भूस्खलनामुळे घसरले असल्याची माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुरांतोतील सारे प्रवासी सुखरूप आहेत तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. यामुळे मध्यरेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

काही दिवसांपूर्वी कलिंगा उत्कल एक्सप्रेस  आणि कैफियत एक्सप्रेस या दोन गाड्याही रूळावरून घसरल्या होत्या. तेव्हा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नैतीक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यायची तयारी दाखवली होती. पण तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना काही काळ थांबायला सांगितलं होतं.

दरम्यान  दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने  मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. सेवाग्राम एक्स्प्रेस मनमाडला उभी आहे तर पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी पासून परत पाठविण्यात येणार आहे . इतर लांब पल्ल्याच्या गाड्याही  उशिराने धावत आहे. तर टिटवाळा ते कसारा दरम्यानची रेल्वे  वाहतूक बंद झाली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 29, 2017 08:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...