पावसाळी अधिवेशन: संत्र्यांच्या शहरात आले संभाजी भिडेंच्या शेतातले आंबे

पावसाळी अधिवेशन: संत्र्यांच्या शहरात आले संभाजी भिडेंच्या शेतातले आंबे

त्यांचा एकंदरीत पेहराव आणि त्यांच्या हातातील आंबे याकडे पाहून अनेकजण आपलं हसू रोखू शकलं नाही

  • Share this:

मुंबई, 04 जुलै: विधीमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनात शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या अटकेचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. संभाजी भिडेंच्या अटकेच्या मुद्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. नेमकी हाच मुद्दा अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये हे संभाजी भीडेंच्या वेशात विधानभवनात आले. आमदार गजभिये यांनी भिडेंच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी सोबत आंबेही आणले होते. या वेशामुळे विधानभवन परिसरात आमदार गजभिये यांचीच चर्चा होताना दिसली. यावेळी आमदार गजभिये यांनी भाजप आमदारांना हे आंबे भेट देण्याचा प्रयत्नही केला.

हेही वाचा: 47 वर्षांनंतर नागपुरात पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन!

माझ्या शेतामधील आंबा खाल्ल्याने जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते, असं विधान संभाजी भिडेंनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधील एका कार्यक्रमात केलं होतं. याच पार्श्वभूमीवर गजभिये अधिवेशनात टोपलीतून आंबे घेऊन आले. विशेष म्हणजे, या आंब्यांवर 'संभाजी भिडेंच्या शेतातील आंबे' असं त्यांनी लिहिलं होतं. त्यांचा एकंदरीत पेहराव आणि त्यांच्या हातातील आंबे याकडे पाहून अनेकजण आपलं हसू रोखू शकलं नाही.

हेही वाचा: पावसाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी मांडली 10 विधेयक

हे अधिवेशनही केवळ औपचारीकता ठरेल असं बोललं जातंय. अडीच आठवड्याच्या या अधिवेशनात संपूर्ण राज्याचे विषय येणार असल्यानं या अधिवेशनातून विदर्भाला काही फार अपेक्षा नसल्याचं सांगितलं जातंय. हे अधिवेशन राज्यासाठी आहे त्यामुळे विदर्भाला त्याकडून फार काही अपेक्षा नाही. सरकारच्या अंतर्गत अडचणीमुळे हे अधिवेशन नागपुरात आहे अशी प्रतिक्रिया विदर्भवादी श्रीनिवास खांदेवाले यांनी दिली.

हेही वाचा: भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 02:06 PM IST

ताज्या बातम्या