'नागपूर मेट्रो'चा हा विक्रम बघून तुम्हीही थक्क व्हाल!

'नागपूर मेट्रो'चा हा विक्रम बघून तुम्हीही थक्क व्हाल!

देशातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांमध्ये नागपूर मेट्रो ही सर्वात इनोव्हेटीव्ह आहे असा दावा नितीन गडकरींनीही केला होता.

  • Share this:

प्रविण मुधोळकर, नागपूर 25 जून :  कडक उन्हासाठी प्रसिद्ध असणाऱ्या नागपूरात महामेट्रोने उन्हाचा फायदा घेत विक्रमी सोलर वीज तयार करायला सुरवात केलीय. मे महिन्यात महामेट्रोने  नागपूर मेट्रो प्रकल्पातून एक लाख चार हजार युनिटची वीज निर्मिती केलीय. महामेट्रोने खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट या चार स्टेशन्सह दीक्षाभूमीजवळी  मेट्रो भवनावर 2342 सोलर पॅनल लावले आहेत. नागपूर मेट्रोच्या एकूण गरजेपैकी 65 वीज ही सौर वीजेतून भागवली जाते.

दिल्ली मेट्रो सारखे प्रकल्प राजस्थानातील सोलर प्रोजेक्ट मधून वीज घेताहेत पण नागपूर मेट्रोनं स्वत:च वीज निर्मिती करत असल्याने एक वेगळा प्रकल्प उभा राहिलाय. नागपूर मेट्रोच्या सर्व रेल्वे स्टेशनच्या आणि कार्यालयावरील छतावर सोलर पॅनल लावण्यात आली आहे. स्टेशन्स, प्लॅटफार्म, मेट्रो ऑफिस आणि मेट्रोच्या इमारतीमध्ये फक्त सोलर वीजेचाच वापर केला जातो अशी माहिती महामेट्रोचे एमडी बृजेश दीक्षित यांनी दिली.

असा उभारला पैसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर मेट्रोचं 7 मार्चला उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांनी नवी दिल्लीतून रिमोट कंट्रोलने या मेट्रोचं लोकार्पण केलं. त्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले, नागपूर मेट्रोसाठी कोट्यवधी रुपयांची गरज होती. मात्र महापालिकेकडे तेवढे पैसे कुठून येणार? त्यामुळे महापालिकेच्या मोक्याच्या जागेवर असलेलं अतिक्रमण हटवून आम्ही 150 कोटींची जागा मेट्रोसाठी दिली आणि प्रकल्प मार्गी लागला.

देशातल्या सर्व मेट्रो प्रकल्पांमध्ये नागपूर मेट्रो ही सर्वात इनोव्हेटीव्ह असल्याचा दावाही त्यांनी केला. या मेट्रो प्रकल्पामुळे नागपूरच्या विकासाला दिशा मिळेल असंही ते म्हणाले होते. अन्य काही कामांमुळे मला यावेळी नागपूरला येता आलं नाही मात्र दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनाला नक्की येईल असं पंतप्रधानांनी सांगितलंहोतं.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधानांना दुसऱ्या टप्प्यासाठी नागपूरला येण्याचं आवाहन केलं होतं.

नागपूर मेट्रोच्या पहिल्या व्यावसायीक मेट्रो ट्रेनचे सारथ्य महिला करत आहे. सुमेधा मेश्राम या पायलट ही ट्रेन चालवित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्ड वेळेत हा मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2019 06:52 PM IST

ताज्या बातम्या