भाजपच्या आशिष देशमुखांनी आमदारकीचा दिला राजीनामा, काँग्रेसच्या वाटेवर

भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2018 02:16 PM IST

भाजपच्या आशिष देशमुखांनी आमदारकीचा दिला राजीनामा, काँग्रेसच्या वाटेवर

नागपूर, 02 ऑक्टबर: भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज ई-मेल आणि फॅक्सने राजीनामा मुंबईला पाठवला आहे. तर  उद्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना ते प्रत्यक्ष भेटून राजीनामा सोपवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आशिष देशमुख सरकारवर नाराज होते. अनेक वेळा सरकारविरोधातली ही नाराजी त्यांनी उघड-उघड मांडली आहे आणि अखेर आज गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर आशिष देशमुख यांनी थेट आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

तर आशिष देशमुख हे राहूल गांधी यांच्या वर्ध्यातल्या सभेत उपस्थित राहणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशमुख आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

तर गेल्या काही दिवसांआधी आशिष देशमुख यांनी स्वपक्षाविरोधातच जोरदार फटकेबाजी केली होती. 'अच्छे दिन आता जाणार आहे' असे म्हणत देशमुख यांनी भाजपविरोधात उघड बंड पुकारले होते. या महोत्सवात देशमुख मोठी घोषणा करण्याची शक्यता होती, पण भाजपचा राजीनामा देणार होतो पण शतृघ्न सिन्हा यांनी सांगितल्यामुळे मी माझा निर्णय मागे घेतल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.

 VIDEO: घराला लागलेल्या आगीत 2 लहान मुलांचा होरपळून मृत्यू

Loading...

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2018 02:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...