नागपूर, 29 मे : जिल्ह्यातील काटोलजवळ एका रेल्वेचे चाक तुटल्याची धक्कादायक घटना घडलीये. या दुर्घटनेत एक महिला जखमी झालीये.
उत्तरप्रदेशातील गोरखपुरहून बंगलोरच्या यशवंतपुरला ही एक्स्पेस जात होती. अचानक सोनखांब जवळ गाडीचं एक चाक तुटले होतं. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानाला वेळीच रेल्वेचं चाक तुटल्याचं लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. रेल्वे गाडीचे चाक तुटल्याने एक महिला प्रवाशी जखमी झाली आहे.
सकाळी आठपासून ही रेल्वे सोनखांब स्टेशन जवळच उभी करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दरम्यान चाक तुटलेल्या कोचला वेगळे करून रेल्वे पुढे रवाना करण्यात येणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा