नागपूर डबल मर्डरचा 8 तासात खुलासा, मुलीनेच प्रियकरासोबत केला खून

दाम्पत्याच्या दत्तक मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने कट रचून हे निर्घृण हत्याकांड घडवून आणल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 09:43 AM IST

नागपूर डबल मर्डरचा 8 तासात खुलासा, मुलीनेच प्रियकरासोबत केला खून

प्रविण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपूर, 16 एप्रिल : सोमवारी नागपूरमध्ये एका वृद्ध दांपत्याची हत्या झाल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता या हत्येमागचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वाडीच्या सुरक्षानगरातील शंकर अतुलचंद्र चंपाती (वय ७२) आणि त्यांची पत्नी सीमा (वय ६४) या वृद्ध दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या 8 तासात यश मिळवलं आहे.

कोट्यवधींची मालमत्ता हडपण्याच्या हेतूने मृत्यू

दाम्पत्याच्या दत्तक मुलीने तिच्या प्रियकराच्या मदतीने कट रचून हे निर्घृण हत्याकांड घडवून आणल्याचं पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी चंपाती दाम्पत्याची दत्तक मुलगी ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका (वय २३) तसंच तिचा प्रियकर इकलाख (वय २२) या दोघांना अटक केली.

शंकर चंपाती हे वेकोलिचे निवृत्त अधिकारी असून ते दत्तवाडीतील सुरक्षानगरात राहत होते. त्यांनी सहा महिन्यांची असताना प्रियंकाला दत्तक घेतलं होतं. पण पोटच्या गोळ्यासारखं वाढवणाऱ्या आई-वडिलांचाच प्रियांकाने खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चंपातींच्या प्रशस्त निवासस्थानी 12 भाडेकरू राहतात. कोट्यवधींची मालमत्ता, निवृत्ती वेतन आणि महिन्याला 25 ते 30 हजार रुपये घरभाडे मिळत असूनही शंकर चंपाती दत्तवाडी चौकात नारळ पाणी विकत होते.

हेही वाचा: अवकाळी पावसात 3 जणांचा मृत्यू, ढगाळ वातावरणामुळे 'या' शहरांत पावसाची शक्यता

पोलिसांना शंकेची पाल चुकचुकली आणि तिची चौकशी केली असता तिने तब्बल 5 तास पोलिसांची दिशाभूल केल्यानंतर अखेर हत्याकांडाची कबुली दिली. प्रियकर इकलाखच्या मदतीने हे दुहेरी हत्याकांड घडवून आणल्याचंही तिने सांगितलं.

दरम्यान, सोमवारी चंपाती दांपत्यांची हत्या झाल्याचं प्रियांकामुळेच समोर आलं. कामावरून घरी जाताच तिने घरात आई-वडिलांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहिला आणि त्यानंतर तिने पोलिसांना प्राचारण केलं. पण आता पोलिसांनी केलेल्या या खुलास्यानंतर सत्य लपवण्यासाठी दिशाभूल केली असल्याचंही समोर आलं आहे.

तर पोलीस आता प्रकरणात प्रियांका आणि तिच्या प्रियकराची कसून चौकशी करत आहेत. पण या झालेल्या आजची तरुणाई नेमकी काय विचार करतेय याचं एक भीषण वास्तव समोर आलं आहे.


VIDEO : ...आणि भाजपच्या जाहिरातीतल्या 'पोस्टर बाॅय'ला राज ठाकरेंनी व्यासपीठावरच बोलावलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2019 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close