नागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले!

नागपुरला डेंग्यूचा डंख; 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले!

नागपूर शहरावर डेंग्‍यूची साथ पसरली असून आतापर्यंत 60 डेंग्यूचे पाँझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 29 ऑगस्ट : नागपूर शहरावर डेंग्‍यूची साथ पसरली असून आतापर्यंत 60 डेंग्यूचे पाँझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 51 रुग्ण एकट्या ऑगस्ट महिन्यात आढळले आहेत, तर उर्वरित ९ जुलै महिन्यात आढळले होते. ही जरी सरकारी आकडेवारी असली तरी शेकडो रुग्ण नागपुरच्या खाजगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये डेंग्यूवर उपचार घेत आहेत.

नागपूर महानगर पालिकेच्या कार्यालयाबाहेर कारंजासाठीच्या टाकीतील पाण्यात डेंग्यू आणि मलेरियाचे डास उत्पन्न झालेत. शहरातील जवळपास दोन हजार पेक्षा जास्त घरांमध्ये मनपाच्य पथकाने डेंग्यूच्या अळ्या शोधल्या. मात्र महापालिकेच्या कार्यालयाकडेच मनपाचे दुर्लक्ष आहे. शहरात डेग्यूने थैमान घातलं असल्याचं मनपाने मान्य केलंय, पण कारवाई मात्र अपुरीच दिसते.

डेंग्यूच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांमध्ये लहान मुले आणि तरुणांचे प्रमाणही मोठे आहे. त्यातच जागोजागी साचलेला कचरा, घाण, दुर्गंधी, उघड्या गडरलाइन, पावसाचे साचलेले पाणी, मोकळ्या जागांवर पावसामुळे कमरेइतकी वाढलेली झुडपे, फवारणीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यावर पोसल्या जात असलेल्या डासांमुळे डेंग्युचा प्रकोप वाढत चालला आहे.

यंदा दमदार पाऊस झाल्याने शहरात ठिकठीकाणी मोकळ्या जागेवर साचलेल्या पाण्यात, अनेक बंद इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी भरल्याने डेंग्यूचे डास उत्पन्न होताहेत. डेग्यूच्या प्रकोपामुळे शहरातील शासकीय आणि खाजगी दवाखाने रुग्णांनी खचाखच भरले आहेत. पण, ज्या महापालिकेला डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखायचा आहे त्यांच्या कार्यालयातच डेंग्यूला पोषण मिळतय. त्यामुळे मनपाचा हा कारभार दिव्याखाली अंधार असल्या सारखी परिस्थीती आहे.

याबाबत नागपूर उपमहापौर दिपराज पार्डीकर यांना विचारले असता, दोन हजार घरामध्ये आम्हाला डेंग्यूच्या अळ्या आढळल्याचे त्यांनी सांगितले. शहरात 51 रुग्ण पाँझिटीव्ह आढळून आले असून, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही शहरात पाच फाँगींग मशीन्स फिरवत असल्याचे त्यांनी न्यूज18 लोकमतला सांगितले.

तर विभागात 1200 रुग्णांची आम्ही तपासणी केली होती, त्यात 188 रुग्ण पाँझिटीव्ह असल्याचे नागपूर आरोग्य विभागाचे संचालक संजय जयस्वाल यांनी सांगितले. विशेषतः शुद्ध पाण्यात डासाची उत्पत्ती होत असल्याने नागरिकांनी खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात असा सल्ला त्यांनी दिलाय. तसेच ठिकठीकाणी साचलेल्या पाण्यावर माती टाकावी असेही त्यांनी सांगितले.

PHOTOS : तुम्हाला ड्रोन उडवायचं आहे ? मग हे नियम जाणून घ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2018 08:38 PM IST

ताज्या बातम्या