S M L

नागपूर बससेवेतील कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

राज्य शासनाने मेस्मा लावल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. भारतीय कामगार सेनेनं संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Sonali Deshpande | Updated On: Feb 21, 2018 10:42 AM IST

नागपूर बससेवेतील कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

 नागपूर , 21 फेब्रुवारी : शहर बससेवेतील कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेतलाय. राज्य शासनाने मेस्मा लावल्याने कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. भारतीय कामगार सेनेनं संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.

किमान वेतनाच्या मागणीसाठी अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मंगळवारी सकाळपासून एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. नागपूर महापालिकेद्वारे शहर बससेवा संचालित करण्यात येत आहे. शहरात दररोज ३५० च्यावर बसेस धावतात. हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर, कन्हान, वाडी, चौदा मैल, खापरखेडा, पारडी, नरसाळा, पिपळा असा शहरापासून जवळपास ३० किलोमीटरचा प्रवास करतात. शहरालगतच्या ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने बसचा प्रवास करतात. यात विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. बससेवेपासून महापालिकेला दररोज १८ ते २० लाखाचा महसूल मिळतो.

ही बससेवा जवळपास अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना तीन हजार ते नऊ हजार दरम्यान वेतन देण्यात येते. या तोकड्या मानधनावर काम करणे अशक्य असल्याने, भारतीय कामगार सेनेच्या निर्देशानुसार ऐन परीक्षेच्या तोंडावर संप पुकारला होता.  महापालिका जोपर्यंत १८,३९८ रुपये किमान वेतन देत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2018 10:42 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close