S M L
Football World Cup 2018

नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

3 दिवसांपासून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार सुरू होते. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आलीये.

Sachin Salve | Updated On: Apr 20, 2017 09:11 PM IST

नागपूरच्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

20 एप्रिल : नागपूरच्या आमदार निवासमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. 3 दिवसांपासून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार सुरू होते. या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आलीये.

अमरावती रोडवरील सिव्हिल लेन भागात असलेल्या आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन दिवसांपासून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी दोन नराधमांना अटक करण्यात आलीये. मनोज भगत आणि रजत मद्रे अशी आरोपींची नावे आहेत आणि त्यांना नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित मुलगी ही ४४ वर्षीय मनोज भगत याच्या ज्वेलर्सच्या दुकानात काम करत होती. मनोजने या मुलीला फसवून आमदार निवास परिसरात आणले. दरम्यान या ठिकाणी २० वर्षीय रजत मद्रे याने ही आमदार निवासाची खोली बुक केली. याच ठिकाणी मनोज भगत आणि रजत मद्रे या दोघांनी या मुलीवर सलग तीन दिवस अत्याचार केले.

१४ एप्रिलला ही मुलगी नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली होती. दरम्यान या मुलीच्या आई वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलीच्या हरवण्याचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणात तपास करून या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेतले. आमदार निवासातील खोल्या या आमदार किंवा वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या चिठ्ठीनेच दिल्या जातात पण या प्रकरणात आरोपी मनोज भगत याला ही खोली खाजगी व्यक्ती म्हणून देण्यात आली होती. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स भागात असणाऱ्या या आमदार निवासातील या घटनेमुळे या ठिकाणी सुरक्षेसाठी असणारे पोलीस आणि काम करणारे कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.  राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

 

आयबीएन लोकमतचे सवाल

 

नागपूरच्या आमदार निवासात चाललंय काय?

आमदार निवासाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात?

आमदार निवासस्थानांचे व्यवस्थापक झोपले का?

 आमदार निवासात असे प्रकार घडतातच कसे?

गृहमंत्रालयाचा प्रभार असलेले मुख्यमंत्री इकडे लक्षं देणार का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2017 08:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close