नागपूर आमदार निवासातील बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी केला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2017 04:21 PM IST

नागपूर आमदार निवासातील बलात्कार पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

22 एप्रिल : नागपूरच्या आमदार निवासात सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे यांनी केला आहे.

अमरावती रोडवरील सिव्हिल लेन भागात असलेल्या आमदार निवासात एका अल्पवयीन मुलीवर तीन दिवस सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या प्रकरणी मनोज भगत आणि रजत मद्रे या नराधमांना अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर पीडित मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय असा दावा नीता ठाकरे यांनी केलाय.

त्यामुळे या मुलीच्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्याची मागणी ही ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान पीडित मुलीने असा कुठलाही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याच नागपूर पोलिसांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...