नागपुरात तरुणीचं अपहरण करून बलात्कार

नागपुरात तरुणीचं अपहरण करून बलात्कार

एक स्कॉर्पिओ गाडी आली आणि आरोपी वाहन चालक राजेश चिकलोंडे याने गाडी आडवी करत सिनेस्टाईल अपहरण केलं. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत सेमिनरी हिल्स भागातील निर्जन स्थळी तिच्यावर गाडीतच बलात्कार केला.

  • Share this:

17 जून : नागपुरात 20 वर्षीय तरूणीचं अपहरण करून बलात्कार केल्याची धक्‍कादायक घटना घडलीय.

मुळची मध्यप्रदेशातील जबलपूर असलेली ही तरूणी नागपुरच्या शासकीय वसतीगृहात शिक्षणानिमित्त राहते. शुक्रवारी रात्री तिची आई आणि काही नातेवाईक तिला भेटण्यासाठी नागपुरात आले होते. दिवसभर सर्वांनी एकत्र वेळ घालविल्यानंतर रात्री एका हॉटेलमध्ये सर्व जेवायला गेले. रात्री उशिरा परतत असताना या तरूणीचा तिच्या आईची वाद झाला. त्यामुळे रागारागात ती गाडीतून उतरून पायीच वसतीगृहाकडे निघाली.

दरम्यान, एक स्कॉर्पिओ गाडी आली आणि आरोपी वाहन चालक राजेश चिकलोंडे याने गाडी आडवी करत सिनेस्टाईल अपहरण केलं. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत सेमिनरी हिल्स भागातील निर्जन स्थळी तिच्यावर गाडीतच बलात्कार केला. परतत असताना पीडितीनं आरडाओरड सुरू केला. त्यामुळे या आरोपीनं तिला एलएडी कॉलेजसमोर सोडून पळ काढला. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काहींनी तिची चौकशी केली आणि पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान आरोपीनं अपहरण केल्यावर सुरूवातीला रेल्वेस्थानकावर घेऊन गेला. त्याठिकाणी तो एका तरूणाशी भेटला. त्यानंतर त्यानं तिला सेमिनरी हिल्स भागात नेलं. या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केल्यावर आरोपीचा सुगावा लागला. आरोपी राजेश हा रेल्वेत भाडेतत्वावर असलेल्या वाहनात चालक आहे. रेल्वेतील अधिकाऱ्यांना ने-आण करण्याचं काम तो करतो. आरोपीनं गुन्हा कबूल केला असून यात आणखी कुणाचा समावेश आहे का आणि इतर बाबी पोलीस तपासताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2017 05:43 PM IST

ताज्या बातम्या