S M L

72 हजार नोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव - मुख्यमंत्री

शासनाच्या 72 हजार जागांच्या मेगा भरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात येईल.

Updated On: Jul 19, 2018 02:19 PM IST

72 हजार नोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव - मुख्यमंत्री

नागपूर, 19 जुलै : शासनाच्या 72 हजार जागांच्या मेगा भरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात येईल. यासाठी उच्च न्यायालयात यावर निर्णय झाल्यावर या राखीव पदासंदर्भात निर्णय घेता येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाने आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक आंदोलन सुरू केलंय. याबाबत विरोधकांनीही सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिलं आहे.

शासनाने ७२ हजार जागांची मेगाभरती काढलीय. त्यात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळणार की नाही, असा सवाल मराठा संघटनांनी उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं आहे. मराठा समाजावर अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ईव्हीएमच्या जोरावर भाजप निवडणुका जिंकतं, राज ठाकरेंचा आरोप

यासंदर्भात परभणी मराठा समजाने मोर्चा काढला होता. कायद्याला दोन्ही सभागृहात मंजूरी दिली. पण नंतर हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली. मागासवर्गीय आयोग काम चालले. अहवाल दिला की पुढील कार्यवाही केली जाईल. मराठा आरक्षणाचा निर्णय हा कोर्टाच्या हातात आहे. मोठी महाभरती होणार त्यात ७२ हजार जागा आहे, त्याव्यतरिक्त मराठा समाज १६ टक्के जागा रिक्त राहील. त्या जागांवर राज्य सरकारने निर्णय घेतला की १६ टक्के मराठा जागा भरल्या जातील असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

हेही वाचा...

Loading...
Loading...

GOOD NEWS : शेतीच्या 'या' योजनांसाठी 1 लाख 55 हजार कोटीचं पॅकेज जाहीर

घराची भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून 2 बहिणींचा जागीच मृत्यू

पुण्यात सोशल मीडियावरून सुरू होतं सेक्स रॅकेट...

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2018 02:17 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close