S M L

भास्कर जाधवांची 'पंचाईत', गुहागरमध्ये राष्ट्रवादीने जिंकली एकच जागा

भास्कर जाधव स्वत: गुहागरमधून आमदार आहेत. पण गुहागर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली

Sachin Salve | Updated On: Apr 12, 2018 07:09 PM IST

भास्कर जाधवांची 'पंचाईत', गुहागरमध्ये राष्ट्रवादीने जिंकली एकच जागा

रत्नागिरी, 12 एप्रिल :  जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव यांना गुहागर नगरपंचायत निवडणुकीत जोरदार फटका बसला आहे. राष्ट्रवादीला कशीबशी एकच जागा जिंकता आली.

भास्कर जाधव स्वत: गुहागरमधून आमदार आहेत. पण गुहागर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली. तर शिवसेनेलाही फक्त एकच जागा मिळाली आहे पण शिवसेनेचा पाठिंबा असलेल्या शहर विकास आघाडीला नऊ जागा मिळाल्या. शहर विकास आघाडीही स्थानिकांनी एकत्र येऊन स्थापन केली. त्यामुळे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शिवसेनेनं आपला पाठिंबा शहर विकास आघाडीला दिला.

नगरपंचायतीत निवडणुकीत शहर विकास आघाडीने सर्वाधिक नऊ जागा पटकावल्या असून शहर विकास आघाडीची सत्ता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 06:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close