News18 Lokmat

आता नगर पंचायत अध्यक्षाचीही निवड थेट जनतेतून !

आता नगर पंचायत अध्यक्षाचीही थेट जनतेतून निवड होणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2017 04:25 PM IST

आता नगर पंचायत अध्यक्षाचीही निवड थेट जनतेतून !

24 आॅक्टोबर : ग्रामपंचायत निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता नगर पंचायत अध्यक्षाचीही थेट जनतेतून निवड होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्थानिक निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. थेट नगराध्यक्ष निवडीचा निर्णय भाजपच्या फायद्याचा ठरला. त्यानंतर सरपंच निवडीचाही निर्णय जनतेून घेण्यात आला. सर्वाधिक सरपंच हे भाजपच्या पॅनेलचे असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला होता. आता  नगराध्यक्ष, सरपंच यांच्या पाठोपाठ नगर पंचायत अध्यक्षाची ही थेट जनतेतून निवडीचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळे आता नगर पंचायत अध्यक्षाच्या निवडीत भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आवाहन देणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2017 04:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...