घराशेजारील घाणीमुळे कवी ना.धो.महानोरांनी घरंच सोडलं

जळगाव शहरातील सुमारे २८ हजार खासगी भूखंड अक्षरश: कचऱ्याचे आगार झाले आहेत. त्या ठिकाणी आजूबाजूच्या रहिवाशांकडून टाकला जाणारा कचरा, उष्ट्या अन्नामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे शहरात डेंग्यू चिकुनगुनियाचे दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. घराजवळील खुल्या भूखंडावर कचरा होऊ नये, यासाठी कविवर्य महानोरांनी अनेकवेळा जळगाव मनपाकडे लेखी, तोंडी तक्रारी केल्या. त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे शेवटी स्वत:चे हक्काचे घर साेडून भाड्याच्या घरात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 13, 2017 09:07 AM IST

घराशेजारील घाणीमुळे कवी ना.धो.महानोरांनी घरंच सोडलं

जळगाव, 12 ऑक्टोबर: घराशेजारी घाण आहे म्हणून कुणाला राहातं घरं सोडावं लागणं ही प्रशासनाची नामुष्की आहे. हे  ना. धों. महानोर यांच्यासारख्या कवीबद्दल घडलं आहे. त्यांना घर सोडून भाड्याच्या घराच आता रहावं लागतं आहे.

जळगाव शहरातील खासगी भूखंडांवरील अस्वच्छता हा गंभीर मुद्दा बनला आहे. यामुळे शहरात डेंग्यू, चिकुनगुन्या इतर आजारांचे रुग्ण प्रचंड वाढले आहेत. त्याचा फटका पद्मश्री कविवर्य ना. धो. महानोर यांनासुद्धा बसला आहे. सलग तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जळगावातील उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या आदर्शनगरातील घराजवळील परिसर स्वच्छ होत नसल्याने स्वत:चे घर सोडून भाड्याच्या घरात राहण्याची वेळ महानोरांवर आली आहे. जळगाव शहरातील सुमारे २८ हजार खासगी भूखंड अक्षरश: कचऱ्याचे आगार झाले आहेत. त्या ठिकाणी आजूबाजूच्या रहिवाशांकडून टाकला जाणारा कचरा, उष्ट्या अन्नामुळे दुर्गंधी निर्माण झाली आहे. यामुळे शहरात डेंग्यू चिकुनगुनियाचे दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. घराजवळील खुल्या भूखंडावर कचरा होऊ नये, यासाठी कविवर्य महानोरांनी अनेकवेळा जळगाव मनपाकडे लेखी, तोंडी तक्रारी केल्या. त्यानंतरही परिस्थिती बदलली नाही. त्यामुळे शेवटी स्वत:चे हक्काचे घर साेडून भाड्याच्या घरात जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. माझ्यासारख्या कवीला जर घरं सोडावं लागत असेल तर सामान्यांचं काय असा प्रश्न महानोरांनी विचारला आहे.

देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वच्छतेचा इव्हेंट होतोय. कोट्यवधींची जाहिरातबाजी होतीय.पण अशावेळी स्वच्छता खरंच किती प्रमाणात होते आहे हा प्रश्नच या घटनेने निर्माण केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 09:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...