रत्नागिरीतील खेडमध्ये लागला एका रहस्यमयी बेटाचा शोध

जगबुडी वाशिष्ठी खाडीतून प्रवास करताना अनेक मगरींचे दर्शन होते, सहाशे ते सातशे एकर परिसरात पाण्याच्या मधोमध असणाऱ्या या बेटावर केवळ भरतीच्या वेळेलाच जात येते. (चंद्रकांत बनकर, प्रतिनिधी)

 • Share this:

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील जगबुडी वाशिष्ठी खाडीमध्ये एका रहस्यमयी बेटाचा शोध लागला आहे. चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या या बेटाला दिवा बेट म्हणून परिसरात ओळखले जाते. या बेटावर अत्यंत जुन्याकाळातील भग्न अवस्थेत असणाऱ्या देवी देवतांच्या मुर्त्या, घरांचे जोथे, पाण्याचे कुंड, सुबक अशी नक्षीकाम असलेली दगडी बांधकामे निदर्शनास आले आहेत. हे पाहण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी देखील त्या ठिकाणी धाव घेतली आहे.

 निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणामध्ये अनेक नयनरम्य अशी ठिकाणे आहेत आणि त्याच बरोबर रहस्यमयी ठिकाणे देखील आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधील जगबुडी वाशिष्ठी खाडीमध्ये असणारे हे अत्यंत दुर्गम ठिकाणचे दिवा बेट.

 या बेटाबाबत इतिहासात देखील काहीच संदर्भ आतापर्यंत सापडले नाहीत. स्थानिक ग्रामस्थांच्या मते हजारो वर्षांपूर्वी या ठिकाणी लोकवस्ती होती. मात्र, नंतर ते स्थलांतरित झाले.

 आजही या बेटावर प्राचीन मंदिराचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. मात्र, या बेटावर कोण राहत होते. हजारो वर्षांपूर्वी च्या इतिहासाची साक्ष असलेल्या या बेटाचा इतिहास काय आहे? असे अनेक प्रश्न स्थानिक ग्रामस्थांबरोबरच इतिहासकारांना देखील पडला आहे.

 मुंबई गोवा महामार्गापासून केवळ 20 किलोमीटर अंतरावर कोतवली गावात असणाऱ्या बंदरावरून या दिवा बेटावर जात येते.

 खाडीतून प्रवास करताना अनेक मगरींचे दर्शन होते, सहाशे ते सातशे एकर परिसरात पाण्याच्या मधोमध असणाऱ्या या बेटावर केवळ भरतीच्या वेळेलाच जात येते.

 बेटावर गेल्यानंतर रानटी श्वापदांचा आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा सामना करावा लागतो. दिवा बेटावर पोहचल्यानंतर मोठं मोठे पाण्याचे कुंड पाहायला मिळतात.

  जवळपास 7 ते 8 पाण्याचे कुंड त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये पाणी देखील आहे. नंतर जंगलातून दुर्गम झाडे वेलींमधून वाट काढून गेल्यानंतर अनेक भग्न अवस्थेत असणारी दगडी शिल्पे, जुन्या वाड्यांचे भग्न अवस्थेत असणारे जोथे, प्राचीन देवदेवतेंच्या मुर्त्या आणि मातीमध्ये बुजलेला अखंड दगडात कोरीवकाम केलेला मंडप देखील पाहावयास मिळतो.

 स्थानिक ग्रामस्थांना देखील या बेटाबाबत फार काही माहित नाही. मात्र, परिसरातील मच्छीमार भोई समाज दरवर्षी या बेटावर येऊन येथील देवदेवतांची पूजा करतात आणि त्या ठिकाणी सुरक्षेविषयी प्रार्थना करून निघून जातात.

 चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या या मोठ्या रहस्यमयी बेटावर शासनाने उत्खनन केल्यास अनेक माहित नसलेल्या इतिहासाचे संदर्भ सापडू शकतात.

 तसंच निसर्गाच्या कुशीतील या बेटाचा विकास झाला तर एका बाजूला बुजून गेलेल्या प्राची लोक संस्कृतीचा आणि इतिहासाला तर उजाळा मिळेलच शिवाय पर्यटकांचे आणि इतिहास प्रेमींचे हे आवडते ठिकाण बनेल यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 09:39 PM IST

ताज्या बातम्या