भाजपमध्ये माझी अवस्था अडवाणींसारखीच-एकनाथ खडसे

नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन असंच चित्र उरल्याचं सांगत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Aug 28, 2017 11:23 AM IST

भाजपमध्ये माझी अवस्था अडवाणींसारखीच-एकनाथ खडसे

जळगाव,28 ऑगस्ट : भाजपमध्ये आपली अवस्था ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखी झाली आहे, अशी मार्मिक टिपणी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. नव्यांना संधी आणि जुन्यांनी मार्गदर्शन असंच चित्र उरल्याचं सांगत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

जळगाव जिल्हा भाजपच्या संघटन बैठकीत खडसेंचं पुनर्वसन करण्याचा ठराव करावा, यासाठी खडसे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करुन पक्षाच्या शिस्तीचं पालन करण्याचा सल्ला खडसेंनी दिला. 'इतकी वर्ष आपण पक्षासाठी मेहनतीने कार्य केलं. अडवाणींची परिस्थितीही अशीच आहे. आयुष्यभर त्यांनीही पक्षासाठी कष्ट घेतले' असं खडसे यावेळी म्हणाले.

दरम्यान दिवसेंदिवस मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणामुळे भाजपची जोमाने वाढ होत आहे, आगामी काळात राज्यातील अनेक मोठे दिग्गज नेते हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत गिरीश महाजन यांनी दिले. भाजप पक्षाची होणारी वाढ पाहता पुढच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि अन्य काही पक्ष जगाच्या नकाशावरुन नाहीसे होण्याची भीतीही गिरीश महाजन यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 11:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close