पोरानं बापाच्या डोळ्यात घातलं झणझणीत अंजन.. पोलिसांनी केली मदत, अखेर बापालाही वाटली लाज

पोरानं बापाच्या डोळ्यात घातलं झणझणीत अंजन.. पोलिसांनी केली मदत, अखेर बापालाही वाटली लाज

'मुलं अभ्यास करीत नाही,' अशी बहुतांश पालकांची ओरड असते. मात्र, जामनेर (जि.जळगाव) येथील एका मुलाने चक्क जन्मदात्या बापाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आला.

  • Share this:

इम्तियाज अहमद (प्रतिनिधी)

भुसावळ, 31 जुलै- 'मुलं अभ्यास करीत नाही,' अशी बहुतांश पालकांची ओरड असते. मात्र, जामनेर (जि.जळगाव) येथील एका मुलाने चक्क जन्मदात्या बापाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन आला. 'माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा', असे तक्रारदार मुलाने पोलिसांनी सांगितले. मुलाने आपल्या वडिलांविरोधात थेट पोलिस स्टेशन गाठल्याने एकाच खळबळ उडाली. 12 वर्षांच्या या मुलाची डेरिंग पाहून पोलिसांनी ही आश्चर्य व्यक्त केले आहे.

काय आहे हे प्रकरण?

बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाऊस सुरू होता. तितक्यात भुसावळ रोड भागात राहणारा एक मुलगा हाफचड्डी व बनियानवर ओल्याचिंब अवस्थेत जामनेर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याच्या बापावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागला.

'माझा बाप मला अभ्यास करू देत नाही, सारखा टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा', असे तो पोलिसांनी तळमळीने सांगत होता. आई शेतात मजुरी करते व वडील मिस्त्री काम करतात. ते तिघे भांवड असून दोन्ही मुले शेंगोळे आश्रमशाळेत शिकतात, असे त्याने पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांना सांगितले.

पोलिसातील माणुसकीचेही दर्शन..

मुलाची शिक्षणाबद्दलची असलेली तळमळ पाहताच पोलिसातील माणुसकीचेही दर्शन घडले. संवेदनशील मनाचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस कर्मचारी नीलेश घुगे यांनी त्या मुलाची आपुलकीने विचारपूस केली. एवढेच नाही तर त्याला दुकानात नेले. नवे कपडे घेऊन दिले. त्यावर तो म्हणाला, सँडलही पाहिजे. मग काय साहेबांनी त्याला सॅण्डलही घेऊन दिली. अभ्यास करण्याची मुलाची इच्छा आहे. मात्र, बाप टीव्ही पाहतो, अभ्यास करू देत नाही, आईलाही मारतो, हे ऐकून प्रताप इंगळे यांनी त्याच्या आई-वडिलांना बोलाविले घेतले. त्यांनी समज दिली.

VIDEO : आणखी आमदार संपर्कात, पण गिरीश महाजनांनी व्यक्त केली ही शंका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 31, 2019 08:16 PM IST

ताज्या बातम्या