S M L

भाजपप्रवेश निव्वळ अफवा पण सत्तेतून बाहेर पडणे कुठे गेले ?,सदाभाऊंचा राजू शेट्टींना टोला

गेली दीड वर्ष ऐकतोय सत्तेतून बाहेर पडणार हे आता बाहेर पडतो म्हणणाऱ्यांचा शोध घेणार असा टोला पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचा उल्लेख न करता लगावलाय.

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2017 05:55 PM IST

भाजपप्रवेश निव्वळ अफवा पण सत्तेतून बाहेर पडणे कुठे गेले ?,सदाभाऊंचा राजू शेट्टींना टोला

16 आॅगस्ट : माझा भाजप प्रवेश ही अफवा आहे. पण गेली दीड वर्ष ऐकतोय सत्तेतून बाहेर पडणार हे आता बाहेर पडतो म्हणणाऱ्यांचा शोध घेणार असा टोला पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांचा उल्लेख न करता लगावलाय.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी करण्यात आलीये. त्यानंतर आज पहिल्यांदाच सदाभाऊंनी राजू शेट्टीवर टीकास्त्र सोडलं. गेल्या काही कित्येक वर्षांपासून मी ऐकतोय कुणीतरी सत्तेतून बाहेर पडणार आता बाहेर पडणाऱ्यांचा मी शोध घेणार असा टोला सदाभाऊंनी लगावला. तसंच दया भावनेसाठी मी चळवळ करत नाही. मी सुद्धा पण पदयात्रा काढली, पण माझ्या पायाला फोडं आले नाहीत. कारण माझे पाय वडिलोपार्जित मजबूत आहेत अशी टीकाही सदभाऊ खोत यांनी

शेट्टी यांच्यावर केली.तसंच माझ्याकडे आता खूप वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मन समजून घेवून योग्य निर्णय घेणार आहे. मी व्यक्ती द्वेषाने भरलेलो नाही. मलाच लांब पल्याचं कळत असं मी समजत नाही असं म्हणत सदाभाऊंनी राजू शेट्टी चांगलाच टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2017 05:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close