'त्या' कालव्याची दोनच दिवसांपूर्वी दुरुस्ती केली होती- गिरीष बापट

'त्या' कालव्याची दोनच दिवसांपूर्वी दुरुस्ती केली होती- गिरीष बापट

  • Share this:

पुणे, 27 सप्टेंबर : खडकवासला कालवा फुटला, याबाबत चौकशी सुरू केली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या कालव्याची वेळोवेळी दुरुस्ती होते असते दोनच दिवसांपूर्वी दुरुस्ती केली होती असा दावा पालकमंत्री गिरीष बापट यांनी केला.

पुण्यातील जनता वसाहतीत पर्वती कालवा सकाळी 11 वाजता फुटलाय. कालव्याच्या भिंतीला अचानक भगदाड पडल्याने जनता वसाहतीत जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय. दांडेकर पूल परिसरात तर रस्त्यावर तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय.

गिरीष बापट यांनी पत्रकार परिषद घेऊन दुर्घटनेबद्दल माहिती दिली. कालव्याला भगदाड पडल्यानंतर घटनास्थळी पोलीस, अग्निशमन यंत्रणा वेळेवर पोहोचली होती.

या कालव्याची वेळोवेळी दुरुस्त होत होती. 2 दिवसांपूर्वीच याची दुरुस्ती करण्यात आली. य़ा दुर्घटनेत ज्या झोपडपट्टी बाबाबत ज्यांचं नुकसानं झालं त्यांचे पंचनामे केले जातील अशी माहिती बापट यांनी दिली.

Loading...

मात्र, पर्वती कालवा हा आधीच धोकादायक होता. कालव्यावर झाडं उगावले होते. झाडाच्या मुळ्यांनी कालव्याला तडे गेले होते. कालव्याच्या भिंतीतून पाण्याचा निचरा होत होता वेळीत याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली जात होती पण जे घडायचं आज ते घडलं. सकाळी 11 च्या सुमारास कालव्याला भगदाड पडलं आणि गरिबांचा संसार उघड्यावर पडला.

दरम्यान,यात पर्वती कालव्याला भगदाड पडल्यामुळे ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पुणे महानरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांना नागरिकांनी घेराव घातला. यावेळी संतप्त नागरिकांनी पालकमंत्री बापटांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

मुक्ता टिळक यांनी दांडेकर पूल येथील लोकवस्तीत पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी चार तास उलटल्यानंतर महापौरांना आता जाग आली का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थितीत केला. 11 च्या सुमारास कालव्याला भगदाड पडलं 4,5 तास उलटून गेले तरी झोपडपट्टी,वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहील आहे. आमचे अन्न, कपडे, सिलेंडर, फ्रीज, टीव्ही सगळं वाहून गेले. अजून कुणी विचारपूस करायला का आलं नाही?,

पाण्याचा निचरा कधी होणार ?, खाय-प्यायची सोय कधी होणार ?, झालेलं नुकसान कधी भरून देणार अशा प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी केली.

उजव्या मुठा कालव्याला भगदाड, पुण्यात अनेक भागात पाणीच पाणी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...