तुम्हाला आमची विचारपूस करावी वाटली नाही का?, संतप्त पुणेकरांचा महापौरांना घेराव

तुम्हाला आमची विचारपूस करावी वाटली नाही का?, संतप्त पुणेकरांचा महापौरांना घेराव

  • Share this:

पुणे, 27 सप्टेंबर : पुण्यात पर्वती कालव्याला भगदाड पडल्यामुळे ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पुणे महानरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांना नागरिकांनी घेराव घातला. यावेळी संतप्त नागरिकांनी पालकमंत्री बापटांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

मुक्ता टिळक यांनी  दांडेकर पूल येथील लोकवस्तीत पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी चार तास उलटल्यानंतर महापौरांना आता जाग आली का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थितीत केला. 11 च्या सुमारास कालव्याला भगदाड पडलं 4,5 तास उलटून गेले तरी झोपडपट्टी,वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचून राहील आहे. आमचे अन्न, कपडे, सिलेंडर, फ्रीज, टीव्ही सगळं वाहून गेले. अजून कुणी विचारपूस करायला का आलं नाही?,

पाण्याचा निचरा कधी होणार ?, खाय-प्यायची सोय कधी होणार ?, झालेलं नुकसान कधी भरून देणार अशा प्रश्नांची सरबत्ती नागरिकांनी केली.

गेल्या चार तासांपासून पाण्यात अडकलेल्या संतप्त नागरिकांनी त्यांना घेराव घातला. यावेळी पालकमंत्री बापटांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

पुण्याती जनता वसाहतीत पर्वती कालवा सकाळी 11 वाजता फुटलाय. कालव्याच्या भिंतीला अचानक भगदाड पडल्याने जनता वसाहतीत जिकडे तिकडे पाणीच पाणी झालंय. दांडेकर पूल परिसरात तर रस्त्यावर तर पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. तिथे अनेक गाड्याही अडकल्यात. तर दत्तवाडी परिसरातील काही घरांमध्ये पाणी शिरलंय.

दरम्यान, पाटबंधारे विभागाने कालव्यातून होणारा विसर्ग थांबवलाय. कालव्यातील याआधीच्या पाण्याचा निचरा होईपर्यंत अनेक भागात पाणी साचलंय. तर सिंहगड रस्ता, निलायम, आणि सारसबाग मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलीये.

तर दुसरीकडे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. कालवा फुटल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती गिरिष बापट यांनी दिली.

======================================================

VIDEO : भररस्त्यावर सपासप वार करून केला खून,पोलिसांची बघ्याची भूमिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 04:03 PM IST

ताज्या बातम्या