मुस्लीम तरुणाला अडवून केली मारहाण, 'जय श्रीराम' म्हणण्यासही पाडले भाग

कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लिम तरुणास अडवून मारहाण करीत त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 04:36 PM IST

मुस्लीम तरुणाला अडवून केली मारहाण, 'जय श्रीराम' म्हणण्यासही पाडले भाग

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 19 जुलै- कामावरून घरी जाणाऱ्या मुस्लीम तरुणास अडवून मारहाण करीत त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगराता गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. इम्रान पटेल (वय-28) असे पीडित तरुणाचे नाव आहे. बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, इम्रान पटेल हा शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. गुरुवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास तो कामावरून घरी निघाला होता. शहरातील हडको कॉर्नर भागातील मुझफ्फरनगरात तो पोहोचला असता त्याला 8 ते 10 तरुणांच्या टोळक्याने अडवले. त्याच्या दुचाकीची किल्ली काढून घेतली. त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यासही भाग पाडले. इम्रान याने तीन वेळा 'जय श्रीराम' म्हटले. त्यानंतरही टोळक्याने इम्रानला मारहाण केली. या दरम्यान, एका हिंदू दाम्पत्याने इम्रानची टोळक्याच्या तावडीतून सुटका करत मारहाण करणाऱ्या टोळक्याला पिटाळून लावले. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये एमआयएम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. या घटनेमुळे शहरातील काही भागात तणाव पसरला आहे.

भाजप-शिवसेना जर यात्रा काढणार असतील तर दंडुका हातात घेऊ-छावा

दुसरीकडे, लातूर जिल्ह्यातील औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेचा तीन तास रास्ता रोको केली. लातूर-तुळजापूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. दुष्काळाचे प्रश्न विसरून निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना जर यात्रा काढणार असतील तर दंडुका हातात घेऊ, असा इशारा छावा संघटनेने दिला आहे.

Loading...

VIDEO: धक्कादायक! पोषण आहारातील डाळीमध्ये आढळलं वटवाघूळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...