S M L

आरक्षणासाठी निवेदन द्यायला गेलेल्या मुस्लीम आंदोलकांना अटक

आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुस्लीम समाजही आक्रमक झाला आहे.

Updated On: Aug 14, 2018 02:01 PM IST

आरक्षणासाठी निवेदन द्यायला गेलेल्या मुस्लीम आंदोलकांना अटक

शिर्डी, 14 ऑगस्ट : आरक्षणाच्या मागणीसाठी आता मुस्लीम समाजही आक्रमक झाला आहे. नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करणार असल्याचं निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मुस्लीम समाजाच्या आंदोलकांवर मंगळवारी नेवासे पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना अटक केलीय.

मराठा आणि धनगर समाजानंतर आता मुस्लिम समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शिक्षण आणि नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे अशी मुस्लीम समाजाची मागणी आहे. ही मागणी पूर्ण करा, अन्यथा 16 ऑगस्ट रोजी नगर-औरंगाबाद महार्गावरील कायगाव टोका येथे गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करू, अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी गेलेल्या सकल मुस्लीम समाजाच्या आंदोलकांवर नेवासे पोलिसांनी मंगळवारी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना अटक केली.

यावेळी आंदोलकांनी "एकच मिशन.. मुस्लीम आरक्षण" आशा घोषणा दिल्या. अटक केलेल्या आंदोलकांना नेवासे न्यायालयात हजर करण्यात आले असता, आंदोलकांनी जामीन नाकारला. 7 आंदोलकांना 17 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलना दरम्यान कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या युवकाने गोदावरीत उडी मारल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नेवासे पोलिसांनी आंदोलांकवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ताब्यात घेतलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 02:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close