S M L

मराठा, धनगर समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाज आरक्षणासाठी आक्रमक

सकल मराठा कृती समितीच्या धर्तीवर आता मुस्लीम आरक्षण संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे

Updated On: Aug 27, 2018 09:03 AM IST

मराठा, धनगर समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाज आरक्षणासाठी आक्रमक

मुंबई,२७ ऑगस्ट- मराठा समाजापाठोपाठ आता मुस्लीम समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय. आरक्षणासाठी राज्यातील ६० मुस्लीम संघटनांनी एकत्र येत फोरम तयार केलाय. सकल मराठा कृती समितीच्या धर्तीवर आता मुस्लीम आरक्षण संयुक्त कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीच्या माध्यमातून आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं खासदार हुसेन दलवाईंनी सांगितलं. आरक्षणासाठी सनदशीर मार्गानं लढा उभारणार असल्याचंही दलवाईंनी सांगितलं. त्यामुळं आगामी काळात राज्यात आरक्षणासाठी मुस्लीम आंदोलनही पेटण्याची चिन्हं आहेत.

मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाज करतोय. आता यासाठी सनदशीर मार्गानं लढा उभारणार असल्यांच खासदार हुसैन दलावाई यांनी सांगितलंय. मुस्लिम आरक्षण संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून राज्यभर मुस्लिम आरक्षणाचा लढा उभारला जाईल असा निर्णय घेण्यात आला. राज्यातील मुस्लिम समाजासाठी काम करणाऱ्या ६० संघटना एकत्र येऊन हा फोरम तयार केला असून सनदशीर मार्गाने आपण लढा उभारणार असल्याचं खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितलं.

VIDEO : सुप्रिया सुळेंनी बांधली भावाला राखी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 09:03 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close