भयंकर! नागपूरमध्ये गुप्तधनासाठी केला बहीण आणि कुटुंबाचा खून

गुप्तधन, अमरत्व आणि चिरतारुण्य मिळवण्याच्या अंधश्रद्धेतून बहिणीसह तिचे अवघे कुटुंब आणि आपल्याच मुलाला विवेक पालटकर याने संपविल्याचा पोलिसांना संशय आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2018 03:23 PM IST

भयंकर! नागपूरमध्ये गुप्तधनासाठी केला बहीण आणि कुटुंबाचा खून

नागपूर, 19 जून : गुप्तधन, अमरत्व आणि चिरतारुण्य मिळवण्याच्या अंधश्रद्धेतून  बहिणीसह तिचे अवघे कुटुंब आणि आपल्याच मुलाला  विवेक पालटकर याने संपविल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याने या हत्याकांडानंतर मृत अर्चनासह अन्य मृत व्यक्तींच्या डोक्यांचे केस कापले. या केसाची त्याने त्याच्या भाड्याच्या खोलीत अघोरी पूजा केली.

त्यानंतर मृतांच्या नावाखाली ‘ते मेले’ असे लिहून नंतर ते पाण्याने पुसून काढले. सर्वत्र थरकाप उडवून देणाऱ्या नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडात क्रूरकर्मा विवेक पालटकर संबंधी नवनवी धक्कादायक माहिती उजेडात येत आहे.

फरार आरोपी विवेक पालटकर याच्या घराची झडती घेतल्यावर पोलिसांना घरात जादुटोण्याचे साहित्य, मिरची, लिंबू, हळद, कुंकू आणि कापलेले केस आढळले आहे. आठवडाभर झाला तरी विवेक पालटकरचा कुठलाही शोध लागलेला नाही. या प्रकरणात पालटकरवर अंधश्रद्धा विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल आणि आरोपी विवेक पालटकरला अंधश्रद्देसंदर्भात उद्युक्त करणाऱ्या बाबा, तांत्रिक – मांत्रिकाचाही शोध घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याच सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा

अनिश्चितता हीच एक निश्चित गोष्ट आहे, इरफाननं चाहत्यांना लिहिलं वेदनादायी पत्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...