Elec-widget

चारित्र्यावर संशय घेत औरंगाबादेत पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

चारित्र्यावर संशय घेत औरंगाबादेत पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

मागील काही दिवसांपूर्वी ममता बेपत्ता होती. ती नाशिकमध्ये सापडली. दरम्यान तिच्यासोबत घराजवळ राहणार एक तरुण होता. हे पाहून पती आंनदचा राग अनावर झाला होता.

  • Share this:

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगाबाद, 20 जुलै- चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वाळूज महानगरमधील पवननगर भागात उघडकीस आली आहे.

ममता आनंद लोखंडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर आनंद लोखंडे असे आरोपी पतीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिलेली माहिती अशी की, मागील काही दिवसांपूर्वी ममता बेपत्ता होती. ती नाशिकमध्ये सापडली. दरम्यान तिच्यासोबत घराजवळ राहणार एक तरुण होता. हे पाहून पती आंनदचा राग अनावर झाला होता. त्याने तरुणास बेदम मारहाण करून ममताला घरी आणले होते.

Loading...

नंतर पती-पत्नीत नेहमी खटके उडत होते. शनिवारी सकाळी दोघांत कडाक्याचे भांडण झाले. काही वेळात वाद निवळला परंतु आनंदच्या डोक्यात राग कायम होता. त्याने मुलगा शाळेत गेल्यावर ममताचा दोन्ही हातानी गळा आवळून तिची हत्या केली. एवढेच नाही तर ती मृत झाल्याची शहनिशा करण्यासाठी त्याने ममताचा गळा पायाने आवळला. ममता मृत झाल्याची खात्री होताच त्याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

पैशासाठी दारुड्या मुलाने केला वृद्ध बापाचा खून

पैशासाठी एका दारुड्या मुलाने आपल्या वृद्ध बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे इथली ही घटना आहे. विकलेल्या म्हशीच्या पैशाच्या वादातून दारूच्या नशेत मुलाने वडिलांचा दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. हरी पाटील (वय-81)असे मृत वडिलांचे नाव आहे तर लक्ष्मण पाटील असे मुलाचं नाव असून कुरूळप पोलिसांनी लक्ष्मण पाटील याला अटक केली आहे. वृद्ध वडिलांचा दारुड्या मुलाने निर्घृण खून केल्याने चिकुर्डे हे गाव हादरून गेले आहे.

SPECIAL REPORT:सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2019 10:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...